शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय, जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:28 IST

जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिली.

ठळक मुद्देसिव्हिलमध्ये दर बुधवारी तर कारागृहातही शिबीर होणारशासकीय कार्यालयांमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मशीनचा संच बसविण्यात येईलआधार कार्ड काढण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर दि ३  : जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रांमध्ये आधार कार्ड काढण्याची सोय करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी बुधवारी दिली. तांत्रिक कारणामुळे काही महा-ई-सेवा केंद्रांमध्ये आधार कार्ड काढता येत नसले तरी लवकरच ही अडचण दूर होईल, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून विविध शासकीय योजना, कामांसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे; मात्र अनेक महा-ई-सेवा केंद्रांमध्ये आधार कार्ड काढणे बंद असल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेळेकर म्हणाले की, आधार कार्ड काढण्याचे काम पूर्वी खासगी यंत्रणेमार्फत होते. हे काम त्यांनी मोफत करणे अपेक्षित होते. अनेक भागातून त्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर हे काम सरकारी यंत्रणेमार्फत सुरू झाले. सध्या शासकीय केंद्रामध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशीन जीपीएससोबत कनेक्ट आहेत. यातून आधारची मशीन शासनाच्या परस्पर वापरता येणार नाही. आगामी दिवसांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, मंडलनिहाय एका भागात आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये आधार कार्ड काढण्यासाठी मशीनचा संच बसविण्यात येईल. सध्या १२० ठिकाणी आधार संच देण्यात आले आहेत. आगामी दिवसात आणखी ५५ मशीन देण्यात येणार आहेत. ---------------------------महा-ई-सेवा केंद्रातील अडथळे महा-ई-सेवा केंद्रात आधार कार्ड काढणाºया आॅपरेटरचा तपशील शासनाच्या आयटी विभागाकडे देणे बंधनकारक आहे. ही माहिती दिल्यानंतर आयटी विभागाकडून त्यांना पासवर्डही देण्यात येतो. जिल्ह्यातील १७० महा-ई-सेवा केंद्रांपैकी १२० केंद्रांनी आपली माहिती पाठवली आहे. उर्वरित केंद्रांनाही लवकरात लवकर माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती ते जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत त्यांना आधारचे काम करता येणार नाही. या कारणांमुळेच अनेक ठिकाणी आधारचे काम बंद आहे. -----------------------सिव्हिलमध्ये दर बुधवारी तर कारागृहातही शिबीर होणारदिव्यांगांना आधार कार्ड काढता यावे यासाठी छत्रपती शिवाजी सर्वाेपचार रुग्णालयात (सिव्हिल) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दिव्यांगांना दर बुधवारी येथे आधार कार्ड काढता येईल, असेही रेळेकर यांनी सांगितले. कारागृहातील कैद्यांना शासकीय अनुदान मिळते. त्यासाठी आधार सक्तीचे आहे. त्या ठिकाणीही आधार काढण्यासाठी एक दिवस निश्चित करून काम केले जाते.