शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

गोपीनाथराव नाहीत; महाराष्ट्र पोरका झाला!

By admin | Updated: June 8, 2014 01:14 IST

मुंडे यांना श्रद्धांजली : नेते, कार्यकर्त्यांनी जागवल्या आठवणी

सोलापूर : गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यांना तळागाळातील जनतेच्या समस्या ठाऊक होत्या. कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला, अशा भावना भारतीय जनता पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी आज येथे व्यक्त केल्या.भाजपाच्या ग्रामीण संघटनेने मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील शिवस्मारक सभागृहात सभेचे आयोजन केले होते. शहर आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंचावर होते. यावेळी मुंडे यांच्या आठवणीने अनेक जण भावनाविवश झाले. किशोर देशपांडे : जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात मुंडे हे पुण्याचे नेतृत्व करीत होते. माझ्याकडे सोलापूरचे नेतृत्व होते. या आंदोलनात प्रमोद महाजन, मुंडे यांच्यासह मलाही अटक झाली. आम्हाला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले होते, तेव्हापासून माझे गोपीनाथरावांशी संबंध आहेत. मुंडे आज आपल्यात नाहीत; पण विपरीत काळात संघर्ष करीत विधायक काम कसे करायचे, हे आपण मुंडे यांच्या जीवनाकडे पाहून शिकू शकतो. स्वत: मोठे होत असताना इतरांना कसे मोठे करायचे, ही शिकवणही आपणाला त्यांच्याकडून मिळते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते.सुभाष देशमुख : भाजपाची सत्ता स्वबळावर येण्यात मुंडे यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल ते नेहमीच संवेदनाशील असायचे. वंजारी समाज त्यांना देव मानायचा. त्यांची गाडी रस्त्यावरून गेली तर वंजारी समाजाचे लोक तेथील माती कपाळाला लावायचे. शहाजी पवार : मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाची पायाभरणी केली. अलीकडेच दुष्काळावर चर्चा करण्यासाठी त्यांनी माझ्यासह चार जिल्हाध्यक्षांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. त्यावेळी सोलापुरातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी त्यांनी काढल्या. मुंडे यांना राज्याचा अभ्यास होता. ते धाडसी नेते होते. मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाचा पाया घातला, त्यामुळेच आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आज कळस होण्याचा मान मिळाला आहे.रामचंद्र जन्नू : मुंडे हे १२ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील सर्व जुन्या नेत्या, कार्यकर्त्यांबद्दल चौकशी केली. तेव्हाच त्यांचं बोलणं मला खटकलं. ते निर्वाणीचे बोल बोलत आहेत, असे वाटले.नागेश वल्याळ : माझ्या वयाच्या सहाव्या वर्षापासून मी मुंडे यांना पक्षवाढीसाठी कार्य करताना पाहत आलो आहे. ते पक्षासाठी अहोरात्र काम करायचे. माझे वडील लिंगराज वल्याळ यांना अर्धांगवायू झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सावरले. वडिलांच्या मृत्यूनंतर मला उद्योग उभा करून देण्यास सहकार्य केले.आणीबाणीच्या काळापासून नंतर दीर्घकाळ सोलापूर भाजपाचे नेतृत्व किशोर देशपांडे यांच्याकडे होते. त्यामुळे देशपांडेंचा मुंडेंशी घनिष्ट संबंध होता. देशपांडे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. सोलापूरचा कोणताही निर्णय घेताना मुंडे माझ्याशी चर्चा करायचे; नव्हे मला विचारूनच ते निर्णय घ्यायचे.यावेळी चन्नवीर चिट्टे, वीरभद्रेश बसवंती, विष्णू जगताप, पंडितराज कोरे, दत्तुसा कल्पवृक्ष, सय्यद मुलाणी, गणेश चिवटे यांनीही मुंडे यांना शब्दांजली वाहिली.-----------------------------------बापूंना दिली होती जबाबदारीसुभाष देशमुख (बापू) आणि मुंडे यांच्यात अलीकडे राजकीय सख्य नव्हते; पण २७ मे रोजी नवी दिल्लीत बापू-मुंडे भेट झाली. त्यावेळी बापूंवर भाजपाची जिल्हा कार्यालये बांधून देण्याची जबाबदारी टाकल्याची आठवण मुंडे यांनी करून दिली आणि पुन्हा ते काम सुरू करायला सांगितले. बीड येथे पाच एकर जागा देतो. ते भाजपाचे कार्यालय बांधून बीडपासून या मोहिमेची सुरुवात करा, असेही मुंडे म्हणाल्याची आठवण देशमुख यांनी यावेळी सांगितली.