शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा 'संभ्रम' की 'नाद' !

By admin | Updated: December 31, 2015 13:58 IST

विधानपरिषदेच्या निवडणुकीत तब्बल १५ मतपत्रिका बाद झाल्या आहेत. स्थानिक संस्था स्वराज्य संस्थेत प्रतिनिधीत्व करणार्‍या सदस्यांना मतदान कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देऊनही त्यांनी गफलत केली

 सोलापूर: विधानपरिषदेच्या निवडणुकीत तब्बल १५ मतपत्रिका बाद झाल्या आहेत. स्थानिक संस्था स्वराज्य संस्थेत प्रतिनिधीत्व करणार्‍या सदस्यांना मतदान कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देऊनही त्यांनी गफलत केली. मतपत्रिकेतील अंकामध्ये १, २ आणि ३ हे त्यांना लिहिता येत नसल्याचेच या बाद मतपत्रिका पाहिल्यावर दिसून येते. विधानपरिषद निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुसार मतपत्रिकेवर मतदान करावे लागते. यासाठी जि.प. सदस्य, नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सभापती आणि मनपा नगरसेवकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रशिक्षणही देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एक लिहिणे हे अंकामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी किंवा रोमन लिपीमध्ये १,२ किंवा ३ लिहिणे अपेक्षित होते. मात्र घडले भलतेच. यामुळे एक नव्हे तब्बल १५ मते बाद ठरविण्यात आली. १ आकडा फक्त एकाच उमेदवाराला लिहिता येत होता ज्यांनी दोघांना १ पसंतीक्रम दिला ती मतपत्रिका बाद ठरविण्यात आली. बाद झालेल्या १५ पैकी ६ मते भाजपची होती, २ राष्ट्रवादीची होती. दोन मतपत्रिकेवर १ दोन ठिकाणी लिहिले होते तर एक मतपत्रिका चक्क कोरी होती. भाजप ६ आणि राष्ट्रवादीची २ अशी आठ मते खूप गंमतशीर आहेत. काहींना १ लिहिता आले नाही काहींनी ना मराठी ना इंग्रजी ना रोमन अशा चमत्कारीत पद्धतीने आकडे गिरविले आहेत, खाडाखोड केली आहे त्यामुळे या मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या.नगरपालिका, जि.प. आणि मनपा मतदारसंघातील सदस्यांच्याच या मतपत्रिका आहेत त्यामुळे या आपल्या लोकप्रतिनिधींना १, २ आणि ३ लिहिता येत नाही हे पुन्हा सिद्ध झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व करणार्‍या सदस्यांनीच असे केल्याने सर्वसामान्य मतदारांनी काय करावे?, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)