शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

तलाठी नको.. तहसीलदार नको.. तुम्हीच नोंदवा वावरातील पीकपेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST

तहसीलदार अमोल कुंभार यांनी तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी यांची बैठक घेऊन ई-पीक पाहणी मोहिमेला गती देण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्याचं ...

तहसीलदार अमोल कुंभार यांनी तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी यांची बैठक घेऊन ई-पीक पाहणी मोहिमेला गती देण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्याचं आवाहन केलं. त्यानुसार महसूल यंत्रणा झाडून कामाला लागली. गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. शेतावर जाऊन शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्याची माहिती दिली.

------

कशी करावी नोंदणी

प्ले स्टोअरमधून ई-पीकपाहणी हे ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यात स्वतःची माहिती उदा. नाव, आडनाव इत्यादी भरावी, ज्या मोबाइलवर ॲप डाउनलोड करायचे आहे, तो क्रमांक टाकल्यास ओटीपी येईल. त्यावर लॉगिन करून त्यात आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक नोंदवावा. त्यात शेतातील पीक, झाडे, विहीर, पडीक जमीन आदींबाबत माहिती भरता येईल. त्याच ॲपमधून कॅमेरा ओपन करायचा. शेताच्या मध्ये उभा राहून पिकांचा फोटो घ्यायचा आणि हा फोटो अपलोड केल्यानंतर नोंदणी पूर्ण होणार आहे. ही माहिती तलाठ्यांच्या लॉगिनवर दिसताच ते मान्यता देतील.

----

सामायिक खातेदारांसाठी

एकाच गट नंबरमध्ये अनेक खातेदारांची नावे असतात. त्यांची वाटणी अथवा खातेफोड झाली नसेल, तर त्यांना सामायिक खातेदार संबोधले जाते. या सामायिक खातेदारांना स्वतंत्र नोंदी व त्यांच्या पिकांचे फोटो अपलोड करता येईल.

-----

धोत्री गाव आघाडीवर

दक्षिण सोलापूर तालुक्यात ८४,९०२ सर्व्हे क्रमांक आहेत. १५ ऑगस्टपासून ई-पीकपाहणी नोंदणीची मोहीम सुरू झाली. ३१ ऑगस्टअखेर तालुक्यातून केवळ १४४५ खातेदारांनी ई-पीकपाहणी ॲपवर नोंदणी केली आहे. त्यातही १३२३ खातेदार सक्रिय आहेत. त्यांनी संपूर्ण पीकपाण्याच्या नोंदी अद्ययावत केल्या आहेत, तर १२२ खातेदारांनी केवळ रजिस्ट्रेशन केले. धोत्री (१०८), माळकवठे (८०), कंदलगाव (६५) ही गावे आघाडीवर आहेत.

-----

सध्या महसूल खाते ही मोहीम राबवत आहे. कृषी खात्याचीही मदत मिळाली, तर अधिक गती येईल. ई-पीकपाहणी नोंदणी अभियान शेतकऱ्यांसाठी अत्यंत सोपी आहे. प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा. शासकीय योजना, नैसर्गिक आपत्ती, विमा यांसाठी त्याचा उपयोग होईल.

- अमोल कुंभार, तहसीलदार, दक्षिण सोलापूर

----