दुधाला दररोज सकाळी परवानगी आहे. गरज नसताना फ्रीजमध्ये भाजीपाला कोंबून ठेवला जात आहे. त्याची गरज नाही. घरी थोडीच कॅश स्वतःजवळ ठेवा. शिवाय ऑनलाइन ट्रान्झेक्शन करण्याची सवय लावूनच घ्यावी.
ज्यांच्या घरांत ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना बीपी, शुगर, थायराॅइड, दमा, अस्थमा, पॅरालिसिस असे दुर्धर आजार आहेत. त्यांना महिन्याच्या गोळ्या लागतात. त्यांनी आधीच महिनाभराच्या गोळ्या घेऊन ठेवणे. भर लॉकडाऊनच्या काळामध्ये घराबाहेर डॉक्टरांची जुनी फाइल घेऊन बाहेर पडणे व पोलिसांशी वादावादी करणे, खोटा प्रयत्न करू नका. तसेच सिव्हिल हॉस्पिटल, महानगरपालिका, दवाखाने, नजीकचे पोलीस ठाणे या सर्वांचे फोन नंबर सेव्ह करून ठेवा. त्यामुळे मनामध्ये काही जरी शंका आली तर फोनवरून तिथे शंकानिरसन नक्कीच करू शकता. या गोष्टीचे पालन करूनच सर्वांना १५ दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण करायचा आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.