शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

नाथ महाराज पालखीतील वारकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: July 8, 2014 01:08 IST

पालखी मार्गासाठी आंदोलन; प्रशासनाच्या तोडग्याने पालखी पुढे मार्गस्थ

पंढरपूर: नाथ महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी भक्तांनी व्होळे-कौठाळी येथील नदीवर पूल बांधावा यासाठी कौठाळी-व्होळे नदीकडेवर पाच तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तशी हमी दिल्याने पंढरपूरच्या वास्तव्यासाठी पालखी मार्गस्थ झाली.जोपर्यंत शासन पैठण ते पंढरपूर मार्गावरील कौठाळी ते व्होळे येथे पूल बांधण्यासाठी आश्वासन देत नाही, तोपर्यंत पालखी सोहळा हलविला जाणार नसल्याचा पवित्रा नाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज यांनी घेतला. हजारो वारकरी भक्तांनी केलेल्या आंदोलनास कौठाळी-व्होळे येथील ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी वारकऱ्यांनी व्होळे-कौठाळी मार्गावर पूल झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले.वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही शासनाने याची दखल घेतली नाही. पुढील वर्षी आषाढी वारीपूर्वी पुलाचे बांधकाम न झाल्यास पैठण येथूनच नाथ महाराज पालखीचे प्रस्थान करणार नसल्याचे पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. रघुनाथ महाराज यांनी सांगितले. तसेच साडे येथून निघणारी संत बलभीम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. वामन महाराज शिरसाठ यांनीही पूल बांधण्याची मागणी केली.--------------------------आषाढी वारीदिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून कौठाळी-व्होळे मार्गावरील पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू.- गजानन गुरव,तहसीलदार, पंढरपूर