शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

९० हजार साखर पोत्याची परस्पर विक्री; २८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत अशोक कृष्णा जाधव व इतर २१ जणांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून कारखान्याच्या ...

या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत अशोक कृष्णा जाधव व इतर २१ जणांनी १७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून कारखान्याच्या कारभारावर आक्षेप नोंदवले होते. त्यामध्ये लेखापरीक्षक जी. व्ही. निकाळजे यांनी केलेल्या तपासणीत आक्षेप आढळले.

२०१७-१८ व २०१८-१९ मध्ये उत्पादित झालेली साखर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई यांच्याकडे माल तारण कर्जापोटी ताब्यात दिली. तक्रारदाराने ७५ हजार क्विंटल साखर कमी असल्याचे अर्जात म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात ९० हजार ६७० क्विंटल साखर कारखान्याने सदर बँकेस न कळवता परस्पर विक्री केली. बँकेचे तपासणी अधिकारीही या प्रकरणात सामील असून, या साखर विक्रीपोटी २८ कोटी १३ लाख ४ हजार ७८० रक्कम बँक कर्ज खात्यामध्ये जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली.

या साखर विक्रीची रक्कम माल तारण खात्यात भरणा न केल्यामुळे नाहक व्याजाचा भुर्दंड कारखान्याला सोसावा लागला. सदरच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन कार्यकारी संचालक व संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. साखर विक्री टेंडरबाबतची जाहिरात जास्त खप असलेल्या वर्तमानपत्रात दिली नसल्याचे निदर्शनास आले. या नियमबाह्य पद्धतीमुळे साखर विक्री केल्याने स्पर्धात्मक दराचा फायदा कारखान्यास मिळाला नाही. कारखान्यावर साधारणत २०० कोटींचे कर्ज आहे.

गेल्या महिन्यापासून कारखान्यातील कामगार पगारापोटी ६ कोटी ७० लाख ६१ हजार ७९९ रुपये झाले थकीत आहेत. प्रायव्हेट फंडाच्या २ कोटी ७३ लाख ८४ हजार १६० रकमेचा भरणा केला नाही. कारखान्यांमधील ३८ कर्मचारी मयत असून, त्यांची ३१ लाख ५२ हजार ५३३ इतकी रक्कम अद्याप देणे आहे. सदर रक्कम थकीत राहण्याच्या कारणाचा खुलासा मागणी करून सादर केला नाही. सन २०१८-१९ या कालावधीतील ताळेबंद व नफा-तोटा पत्रक संशयास्पद वाटत असल्याचे तक्रारदाराने नमूद केले. याबाबत या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी तक्रारदाराने कोणत्या सालातील ताळेबंद व नफा तोटा याचा उल्लेख केला न करता कंपनी संशयास्पद म्हटले आहे.

कोट ::::::::::::::::::::

लेखापरीक्षण अहवालाबाबत कारखान्याचे अध्यक्ष संचालक मंडळाबरोबर सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर याबाबत आम्ही आमचे म्हणणे प्रसिद्धीसाठी देऊ.

- झुंजार आसबे

कार्यकारी संचालक, दामाजी कारखाना, मंगळवेढा