शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

आश्यर्चम्; सोलापुरातील अवलियाने छतावर फुलवली पालेभाज्यांची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 14:39 IST

छोट्या गोष्टीतून मोठा आनंद; अवलिया आरोग्य अधिकाºयाचा अभिनव प्रयत्न

ठळक मुद्देघराच्या गच्चीवर परसबाग करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे काम करवून घेतले़पॉलिथीन अंथरुन गांडूळखत, कंपोस्ट खत यांचे मिश्रण मातीच्या कुं ड्यातभगवान भुसारी हे सकाळी या गच्चीवर पालेभाज्यांची देखभाल करतात़

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : गावाकडील शेती प्रयोग अस्वस्थ करत़़़ आरोग्य क्षेत्रातून रुग्णांची सेवा करता करता घरीच गच्चीवर पालेभाज्यांची परसबाग फुलवण्याची कल्पना सुचली़़़  या कल्पनेला मूर्त रूप दिले़़़ शुद्ध, रासायनिक खतविरहित भाजीपाला घरच्या घरीच खायला मिळतो आहे़़़ आज वर्षभरातील चार महिन्यांचा पालेभाज्यांचा प्रश्न सुटला आहे़.

भगवान भुसारी असे त्या अवलिया आरोग्य अधिकाºयाचे नाव़ सध्या ते शासकीय रुग्णालयात जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत़ बुलडाण्यातून नोकरीनिमित्त भुसारी यांचे वडील सोलापुरात स्थायिक झाले़ गावाकडे त्यांना शेतीचे वेड होत़े येथे आल्यानंतरही भुसारी कुटुंबाला स्वस्थ बसवू देत नसत़ या कुटुंबाला शेतीतील प्रयोगाचे वेड आहे़ मात्र सोलापुरात आकाशवाणी परिसरात इनमिन ८०० स्क्वेअर फुटात घर उभारले आणि या घरावरच भगवान आणि त्यांच्या पत्नी गोदावरी यांना पालेभाज्यांचा प्रयोग सुचला़ दोघांनी मिळून काळी माती आणली़ काही कुंड्या आणल्या़ तसेच लागणारी काही साधने जमवली़ दोघांच्या प्रयत्नातून तीन महिन्यांत पालेभाज्यांची बाग फुलवली़ या कुंड्यांमध्ये पालेभाज्यांची लागवड केली़ या कल्पनेतून किमान चार महिने पुरेल इतक्या पालेभाज्या झाल्या आहेत.

टेरेसवर, बंगल्याच्या साईड मार्जिनमध्ये आणि परसबागेसाठी जागा असेल तर तेथेही किचन गार्डन विकसित करण्याचा ट्रेंड वाढत आहे़ थोडी जागा असेल तर पाच-सहा जणांच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला घरीच पिकवता येतो़ शिवाय बाग फुलवण्याचे समाधानही लाभते आहे़ 

१२ प्रकारच्या पालेभाज्या...घराच्या गच्चीवर परसबाग करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे काम करवून घेतले़ त्यावर पॉलिथीन अंथरुन गांडूळखत, कंपोस्ट खत यांचे मिश्रण मातीच्या कुं ड्यात भरुन पालेभाज्या लावल्या़ मेथी, कांदा, मिरची, कोथिंबीर, भोपळा, वांगी, कांदे, टोमॅटो, लाल भेंडी, काकडीसह १२ प्रकारच्या पालेभाज्या लावल्या आहेत़ भगवान भुसारी हे सकाळी या गच्चीवर पालेभाज्यांची देखभाल करतात़ त्यानंतर त्यांच्या पत्नी पाणी, गावरान खते घालताहेत़ या परसबागेमुळे घराची शोभा तर वाढली आहे़ घरातील लहान मुलांना वनस्पतींच्या लागवडीविषयी, उपयुक्ततेविषयी माहिती मिळते आहे.

शहरी भागात रासायनिक फवारण्यांव्यतरिक्त पालेभाज्या, फळभाज्या पाहायला मिळत नाहीत़ गावाकडची शेती शांत बसू देत नाही़ तोच प्रयोग सोलापूर शहरात गच्चीवर केला आणि तो यशस्वी ठरला़ आज किमान चार महिने पुरेल इतक्या पालेभाज्या उपलब्ध झाल्या आहेत़ आरोग्याचा विचार करता नैसर्गिक पालेभाज्या घरबसल्या मिळवत आहे़ हाच प्रयोग परिसरात इतर काही लोक करताहेत़ त्यांनाही मदत करत आहे.- भगवान भुसारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डाप्को 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीfoodअन्नAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार