शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील एमआयएम नूतन नगरसेवक तौफीक शेख जेरबंद, दोन पोलीस कोठडी

By admin | Updated: February 27, 2017 18:14 IST

सोलापूरातील एमआयएम नूतन नगरसेवक तौफीक शेख जेरबंद, दोन पोलीस कोठडी

सोलापूरातील एमआयएम नूतन नगरसेवक तौफीक शेख जेरबंद, दोन पोलीस कोठडीसोलापूर : नई जिंदगी परिसरात मनपा निवडणुकीत दगडफेक व मारामारी करुन फरार झालेले एमआयएमचे तौफिक शेख याला बाळे येथून विजापूर नाका पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. सोमवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्याय दंडाधिकारी ए़ आऱ शेंडगे यांनी २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, तौफिक शेख (वय ५०,रा. रेल्वे लाईन ) हा प्रभाग २१, नई जिंदगी परिसरातून एमआयएम पक्षाकडून सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार होता. त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हारुण सय्यद हे निवडणूक लढवित होते. त्यात तौफीक शेख हे विजयी झाले़ तत्पुर्वी मनपा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या प्रचार फेरीदरम्यान एकमेकांवर दगडफेक व हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हारुण सय्यद याला अटक केली. तेव्हापासून तौफिक शेख हा फरार होता. रविवारी अटक केल्यानंतर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयात त्याच्या युक्तीवादावर सुनावणी झाली़ सायंकाळी उशिरा जिल्हा व सत्र न्यायाधीश १११ यांनी ११ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे़ एमआयएम पक्षाचे नुतन नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर यापुर्वीही शहर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ आरोपीतर्फे अ‍ॅड़ ईस्माईल शेख, अ‍ॅड़ बडेखान तर सरकार पक्षातर्फै अ‍ॅड़ आरिफ कोकणी यांनी काम पाहिले़