शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गुडेवारांच्या बदलीमुळे आंदोलन पेटू लागले !

By admin | Updated: June 24, 2014 01:24 IST

गुरुवारी सर्वपक्षीय सोलापूर बंद : माकप, बसपाची निदर्शने

सोलापूर: महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीमुळे सोलापुरातील आंदोलन पेटू लागले आहे़ सोमवारी बसपाच्या वतीने सह्याची मोहीम घेतली, काँग्रेसच्या नेत्यांचा पुतळा दहन केला तर माकपने प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली़ आमदार आडम मास्तर यांनी गुडेवारांची बदली रद्द करण्याची मागणी केली तर सर्वपक्षीय नेत्यांनी मनपा हिरवळीवर बसून २५ जून रोजी सर्वपक्षीय बंद पुकारला आहे़आयुक्त गुडेवार यांनी मनपा कामकाजात पारदर्शकता आणली. काही कटू निर्णय घेतल्यामुळे अनेक जण दुखावले मात्र महापालिकेचे उत्पन्न वाढविल्यामुळे शहरात अनेक विकासाची कामे सुरू झाली, अनेकांच्या देय रकमा मिळू लागल्या, परिवहन खात्याला २०० नव्या बस मंजूर झाल्या, गुडेवारांनी केलेल्या कामांचा पाडा यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाचला़ आडम मास्तर यांनी दोन तास मनपा प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला़ यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, एम़एच़ शेख, नसिमा शेख, माशप्पा विटे, व्यंकटेश कोंगारी आदींनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले़ बसपाचे नेते आनंद चंदनशिवे यांनी पार्क चौकात गुडेवारांची बदली करू नये यासाठी सकाळपासून सह्यांची मोहीम घेतली़ -------------------------------कर्मचाऱ्यांकडून साधा निषेधही नाहीज्या मनपा कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी नियमित वेतन सुरू केले, ज्यांना वर्षभरात ४० टक्के पगारवाढ दिली, ज्या कर्मचाऱ्यांना लाड कमिटीच्या शिफारशी लागू केल्या अशा कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष आयुक्त गुडेवार यांची बदली झाल्यानंतर साधा निषेधसुद्धा नोंदविला नाही़ कामगार नेते अशोक जानराव यांनीदेखील गप्प राहणे पसंद केले़ कामगार कृती संघटनेचे पदाधिकारी काही झाले की रस्त्यावर येतात, सोमवारी मात्र त्यांची भूमिका मात्र संशयास्पद होती़ गुडेवारांच्या बदली प्रकरणातील कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असे पत्रक मनपा सहायक आयुक्तांनी सोमवारी सकाळीच काढले होते़ ---------------------------------------काँग्रेस, राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्ष एकत्रमनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगळता सेना, भाजप, माकप, बसपा, रिपाइं आदींची सोमवारी सायंकाळी मनपा हिरवळीवर बैठक झाली़ गुरुवारी सर्वपक्षीय बंद करण्याची सूचना यावेळी करण्यात आली़ प्राथमिक निर्णय घेण्यात आला़ अंतिम निर्णय मंगळवारी घेण्यात येणार आहे़ या बैठकीस आ़ विजयकुमार देशमुख, माजी आमदार आडम मास्तर, बसपाचे आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, भाजपचे प्रा़ अशोक निंबर्गी, मनसेचे युवराज चुंबळकर आदी उपस्थित होते़------------------------------------------पुतळा जाळला, किरकोळ तोडफोडआयुक्तांच्या बदलीमुळे शहरातील काही संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत़ काही जणांनी सोमवारी सायंकाळी महापौर कार्यालय तसेच कौन्सिल हॉलमधील कार्यालये शटडाऊन केली तर दोन ठिकाणी खिडक्यांच्या काचा फोडल्या़ बसपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला राग व्यक्त केला, तर आडम मास्तर यांनी बदलीमागे सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचंड दबाव होता़ लोकसभेला पराभूत झाले तरीही ते सुधारले नाहीत, असा आरोप मनपा प्रवेशद्वारावरील आंदोलनात केला़