शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

कोवळ्या उन्हात रंगला माऊलींचा दुसरा रिंगण सोहळा

By admin | Updated: July 1, 2017 11:48 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूर

पंढरपूर : गोपालकृष्ण मांडवकर पुरंदावडे येथे झालेल्या माऊलींच्या पहिल्या गोल रिंगण सोहळ्याची ऊर्मी ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी ९ वाजता खुडूस फाटा येथे दुसरा रिंगण सोहळा पार पडला. सूर्यनारायणाच्या कोवळ्या उन्हात माऊलींच्या अश्वांनी बेफाम दौड करून पाच रिंगण पूर्ण केले. ‘हरी विठ्ठल...’ ‘माऊली... माऊली...’च्या गजराने आसमंत निनादले. जणू चैतन्याचा सागरच वारकऱ्यांच्या अलोट जनसागरावर पसरला.माळशिरसवरून सकाळी ६ वाजता माऊलींची पालखी मार्गस्थ झाली. आषाढ शुद्ध सप्तमी हा माऊलींच्या दुसऱ्या गोल रिंगणाचा दिवस असतो. माळशिरस ते खुडूस फाटा हे साडेचार किलोमीटरचे अंतर पूर्ण करून माऊलींची पालखी खुडूस फाट्याच्या मैदानावर पोहोचली तेव्हा दिंड्या आणि भाविकांनी आधीच मैदान फुलून गेले होते. गोल रिंगणाच्या आखणीनुसार मानाच्या दिंड्यांनंतर पालखीने रिंगणाला प्रदक्षिणा घालून आत प्रवेश केला. रिंगणातील स्थळावर माऊली विराजित झाल्यावर अश्व सज्ज झाले. तत्पूर्वी रिंगणाच्या मार्गावर सुशोभित रांगोळ्याही घालून झाल्या होत्या. अगदी साडेनऊ वाजता रिंगण सोहळा सुरू झाला. प्रारंभी स्वाराने हाती भगवा ध्वज उंच धरून रिंगण घातले. त्यानंतर माऊलींच्या अश्वाने एकापाठोपाठ पाच रिंगण पूर्ण केले. विठुनामाचा गजर, माऊली... माऊली... असे वारकऱ्यांच्या मुखातील अखंड उच्चारण आणि टाळ-मृदंगाच्या गजरात हा रिंगण सोहळा कधी पूर्ण झाला हे कळलेच नाही. खुडूसमधील माऊली पालखीच्या रिंगण सोहळ्याला लक्षावधी भाविक उपस्थित होते. पूर्णत: शिस्तीत चालणारा हा सोहळा आणि सहभागी वारकऱ्यांनी घडविलेले एकसंधतेचे दर्शन सुखावून गेले.------------------------------वारकऱ्यांना मिळाली ऊर्जा ४मंत्रमुग्ध झालेल्या लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यानंतर दिंड्यांचा उडीचा खेळ सुरू झाला. पहिल्या गोल रिंगणाबरोबरच आजही दिंड्यांनी माऊलींच्या पालखीभोवती फेर धरला. झेंडेकरी, टाळकरी, मृदंगवादक, वीणेकरी आणि त्यामागे वृंदावनधारी महिलांचा फेर रंगला. ‘ग्यानबा तुकाराम’ जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेले होते. तब्बल अर्धा तास रंगलेल्या उडीच्या खेळाने वारकऱ्यांना नवी ऊर्जा मिळाली.