शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या उपचारासाठी आईने विकले मंगळसूत्र

By admin | Updated: December 26, 2014 23:56 IST

कोल्हापुरात उपचार : अचानक हात-पाय लुळे पडलेल्या प्रथमेशची कहाणी

रवींद्र हिडदुगी - नेसरी -पुढील उपचारासाठी मुलाला दोन लाखांवर खर्च येणार आहे. त्याला मुंबईला घेऊन जावा, असा सल्ला डॉक्टरांकडून मिळताच सोबत असणाऱ्या आई व आजीचे हात-पाय गळाले. काही सुचेनासे झाले. मुंबईला न जाता तिने कोल्हापूरचे एक खासगी हॉस्पिटल गाठले. तेथे तातडीच्या इंजेक्शनसाठी १३ हजारांची जोडणा करा, असे सांगताच हताश झालेल्या आईने मंगळसूत्र व कर्णफुले विकण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथील सराफ गुजरीत आपले दागिने विकण्यासाठी गेले असता त्यांना कुठल्याही सराफाने जवळ केले नाही. शिवाय हे दागिने चोरीचे असल्याचाही काहींनी संशय व्यक्त केला. मुलाच्या उपचारासाठी तिने शेवटी माहेर गाठले आणि ओळखीच्या सराफाकडे जाऊन आपले मंगळसूत्र, कर्णफुले १३ हजारांना विकले अन् मुलासाठी जीव कासावीस झालेल्या आईने पुन्हा कोल्हापूर गाठले.ही करुण कहाणी आहे प्रथमेश प्रदीप कांबळे या सात वर्षांच्या बालकाची. त्याचे मूळ गाव भैरेवाडी असून, त्याचे आजोळ नेसरी आहे. पंधरा दिवसांपूर्वी तो आजोळी नेसरी येथे आईसोबत आला होता. त्याला अचानक उलट्या सुरू झाल्याने खासगी डॉक्टरांनी उपचार केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. दोनच दिवसांत पळणारा, दौडणारा प्रथमेश थांबला. त्याचे हात-पाय लुळे पडले. त्याचे चालायचे बंद झाले.भयभीत होऊन आई निर्मलाने मुलाला नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने डॉ. गवळी, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी व डॉ. सत्यजित देसाई यांनी त्याला कोल्हापूर सीपीआर येथे नेण्याचा निर्णय घेतला. शासकीय रुग्णवाहिकेने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. तेथे त्याची तपासणी केली असता जीबीएस (गीयाबार सिंड्रोम) हा दुर्मीळ आजार झाल्याचे निदान झाले. पुढील उपचारासाठी दोन लाखांवर खर्च अपेक्षित असल्याचे सांगून प्रथमेशला मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता.दरम्यान, या दुर्मीळ आजाराचे निदान झाल्याचे कळताच डॉक्टरांसह नेसरीकरांनी प्रथमेशच्या उपचारासाठी धडपड सुरू केली. दानशूर व्यक्ती, संस्था यांना घेऊन बरीचशी रक्कम गोळा केली. शालेय विद्यार्थ्यांनी तर आपल्या खाऊचे पैसे जमा करून हातभार लावला. सर्व शाळा, महाविद्यालयासह गडहिंग्लज येथील प्रा. अरविंद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गडहिंग्लज येथेही समाधानकारक रक्कम गोळा झाली.नेसरी ग्रामपंचायतीने तर तातडीने बैठक घेऊन मदत गोळा करण्यास मोलाची साथ दिली. त्यासाठी बँक आॅफ इंडिया येथे मदतीसाठी बचत खाते सुरू केले. तेथे दानशूर व्यक्ती, संस्था मदत जमा करीत आहेत.डॉक्टरांनीच घेतला पुढाकाररुग्णांना एरव्ही पुढील उपचाराचा सल्ला देऊन आपल्या कामात गुंतणाऱ्या डॉक्टरांनी मात्र प्रथमेशच्या मदतीसाठी सक्रिय सहभाग घेतल्याने डॉ. गवळी, डॉ. कुलकर्णी व डॉ. सत्यजित देसाई यांच्याबाबत नागरिकांत कमालीचे समाधान व्यक्त होत आहे.प्रथमेशवर डॉ. वसगावकर व डॉ. परुळेकर या डॉक्टरांनी प्रयत्न चालविले आहेत. तो आता धोक्याच्या इशाऱ्यातून बाहेर आला असून, काही दिवसांत चालायला लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.