शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल

By appasaheb.patil | Updated: January 31, 2023 11:40 IST

माघी यात्रेचा सोहळा पंढरपुरात साजरा हाेत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे.

सोलापूर :

माघी यात्रेचा सोहळा पंढरपुरात साजरा हाेत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून उद्या होणाऱया सोहळ्यासाठी पाच लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.  

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते माघी एकादशीची महापूजा होणार आहे. यावेळी सोलापूरसह अन्य भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.  माघी यात्रेच्या उत्सवात मंदिर समितीकडून भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी दर्शनरांगेत पत्राशेड येथे कायमस्वरूपी ४ व तात्पुरते २ असे ६ वॉटरप्रूफ दर्शन शेड उभारण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा असला, तरी मंगळवारीच पाचव्या दर्शन मंडपामध्ये रांग पोहचली होती. अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे १ फेब्रुवारी रोजी माघी यात्रा भरत आहे. या यात्रेत येणाऱया लाखो भाविक वारकऱयांना सेवासुविधा पुरविण्यासाठी मंदिर समितीसह पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

दरम्यान, यात्रेनिमित्त सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. वारकऱयांच्या सुरक्षेसाठी पोलिस रात्रंदिवस बंदोबस्त करीत आहेत. मंदिर समितीने यात्रेच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी केली आहे. पंढरपुरात शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून शहर, चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर व मोठय़ा मठांमध्ये स्वतंत्ररीत्या कचरा साठविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक मठाधिपतींना घंटागाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गोपाळपूर रोड, दर्शन बारी पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शनद्वारे उपलब्ध करून दिले आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणून पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, नगरअभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षीरसागर, अग्निशमन अधिकारी बाळासाहेब कांबळे सर्व विभागप्रमुख प्रयत्नशील आहेत.