शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सोलापूर जिल्हा परिषदेच्या एक हजाराहून अधिक संस्था आयएसओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:11 IST

सोलापूर : गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायती, तीन पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेशी संलग्नित १०७२ हून संस्थांना आयएसओचे मानांकन मिळाले आहे. यातून झेडपीच्या नावलौकिकात भर पडल्याचा दावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी केला आहे.शासकीय कार्यालयाबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलायला हवा. कार्यालयातील वातावरण चांगले असायला हवे, असे ...

ठळक मुद्देझेडपीच्या नावलौकिकात भर पडल्याचा दावापशुसंवर्धनच्या १४३ केंद्रांना आयएसओचे मानांकन मिळाले ४०९ अंगणवाड्यांना आयएसओचे मानांकन

सोलापूर : गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायती, तीन पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेशी संलग्नित १०७२ हून संस्थांना आयएसओचे मानांकन मिळाले आहे. यातून झेडपीच्या नावलौकिकात भर पडल्याचा दावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी केला आहे.

शासकीय कार्यालयाबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलायला हवा. कार्यालयातील वातावरण चांगले असायला हवे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून केले जाते. गुणवत्तेसाठी आजही ‘आयएसओ’ मानांकन महत्त्वाचे मानले जाते. झेडपीशी संलग्नित संस्थांना हे मानांकन मिळायला हवे, यासाठी गेले वर्षभर त्यांनी ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन या विभागाच्या प्रमुखांची नियमितपणे आढावा बैठक घेतली. त्यातही ग्रामपंचायती, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष जोर दिला. चांगल्या शाळा आणि चांगले दवाखाने असतील तर गावातील वातावरणही चांगले राहते, हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. 

सेसमधून दिला निधी - सेवांच्या गुणवत्तेसाठी ‘आयएसओ’चे मानांकन महत्त्वाचे मानले जाते. हे मानांकन मिळविण्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा ठरतो. ‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागते. संबंधित केंद्राची चार टप्प्यात तपासणी केली जाते. कार्यालयातील सुसज्ज व्यवस्था, शौचालय, पाणीपुरवठा अशा विविध मूलभूत सुविधा आदींसाठी विशेष गुण असतात. कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाºया सेवांचे फलक, व्यक्ती या विषयी माहिती केंद्रांमध्ये लावणे आवश्यक असते. ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्रांसाठी तर विशेष निकष आहेत. ‘आयएसओ’साठी काम सुरू झाल्यानंतर कार्यालयाशी संबंधित लोकांचा दृष्टिकोनही त्यातून दिसून येतो. मूलभूत सुविधांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आणि लोकसहभागातूनही निधी देण्यात आला.

तीन पंचायत समित्यांसह विविध केंद्रांचा समावेश - पशुसंवर्धनच्या १४३ केंद्रांना आयएसओचे मानांकन मिळाले आहे. यात ७८ श्रेणी १ चे दवाखाने, ६३ श्रेणी दोनचे दवाखाने, १ पंचायत समितीतील केंद्र, १ कुक्कुटपालन केंद्राचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात ५९ ग्रामपंचायतींनीही हे मानांकन मिळविले. महिला व बालकल्याण विभागांतर्गत ४०९ अंगणवाड्यांना आयएसओचे मानांकन मिळाले. यातही अकलूज केंद्रातील सर्वाधिक १३४ अंगणवाड्यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि एक ग्रामीण रुग्णालय अशा ५२ केंद्रांनीही मानांकन पटकाविले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४०९ शाळांनाही मानांकन मिळाले आहे. अक्कलकोट, माळशिरस आणि पंढरपूर या पंचायत समित्यांचा यात समावेश आहे. 

आयएसओसाठी प्रशासनाने वेळोवेळी खातेप्रमुखांकडे पाठपुरावा केला. यातून केवळ प्रमाणपत्र मिळविणे हा उद्देश नाही. आपल्या कार्यालयातील वातावरण कसे असावे याची जाणीव कर्मचाºयांमध्ये निर्माण व्हावी हा यामागचा प्रयत्न आहे. शाळा आणि आरोग्य केंद्रामध्ये चांगले वातावरण असावे यासाठी तर प्रयत्न करतोय. परंतु, आयएसओ मिळाल्यामुळे कर्मचाºयांना कामातही हुरुप येणार आहे. - डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद