शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी असल्याचे भासवून मॉनिटर पळविला

By admin | Updated: July 23, 2014 00:55 IST

बेडर पूलनजीक असलेल्या राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये हा प्रकार

सोलापूर : हॉस्पिटलमध्ये जसा एखादा वॉर्डबॉय वागतो, अगदी तसाच काहीसा प्रकार काही काळ चोरट्याने केला. कुणाला शंकाही येणार नाही, या पद्धतीने चोरटा वावरत असताना त्याने एका रुग्णाची नाडीही तपासत डॉक्टराचा संदर्भ देत अतिदक्षता विभागातील मॉनिटर हातोहात पळविला. लष्कर भागातील बेडर पूलनजीक असलेल्या राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. गोऱ्या रंगाचा बुटका असलेला हा तोतया वॉर्डबॉय राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये घुसला. हॉस्पिटलच्या आवारात फेरफटका मारून त्याने अंदाजही घेतला. कुठे डल्ला मारायचा याच्या शोधात तो होता. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातही त्याने एंट्री केली. या विभागात बिराजदार नावाचा रुग्ण दाखल असून, त्याची तपासणी करून डॉ. राहुल दत्तात्रय देशपांडे हे निघून गेले. ही संधी साधून चोरट्याने बिराजदारची विचारपूस करीत त्याची नाडी तपासली. रुग्णालाही वाटले हा हॉस्पिटलचा वॉर्डबॉय असेल. डॉक्टराचा संदर्भ देत त्याने मॉनिटर पळविला. या प्रकरणी डॉ. देशपांडे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास सहायक फौजदार बाबर करीत आहेत. --------------------------कॅमेरे असते तर....डॉ. देशपांडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा नसल्याचे समजले. कदाचित ती यंत्रणा असली असती तर चोरटा नक्कीच सापडला असता.