शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दलित महिलेचा विनयभंग, तरुणाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी दाखल

By admin | Updated: August 1, 2016 12:44 IST

दलित महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २९ : दलित महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव (भीमा) येथे गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला होता.

पीडित महिलेने मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित महिला तेलगाव येथील असून ती शेतातील वस्तीवर सासू व सासरे, पतीसह राहते. गुरुवारी सासरे शेजारच्या शेतात कामाला गेले, सासू गावातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गेल्या तर पती अण्णाभाऊ साठे जयंतीच्या तयारीसाठी तेलगाव येथे गेले होते.

शेजारच्या शेतातील हणमंत रामा कुंभार (वय २२,रा. तेलगाव ) हा पीडित महिलेच्या घराजवळ पाळत ठेवून होता. घरात महिलेशिवाय कोणीही नाही याची खात्री पटल्याने तो तिच्या घरात शिरला. हणमंत कुंभार याने सदर महिलेचा हात धरुन तिच्याशी झोंबाझोंबी केली. महिलेने हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तिला जातीवाचक शिवीगाळ केली. झाल्या प्रकाराचा बोभाटा केल्यास तुला आणि तुझ्या घरातील माणसांना सोडणार नाही असा दम भरला. लज्जा वाटेल असे कृत्य केले. याचवेळी ती धावत घराबाहेर पडली. समोर दुचाकीवरुन एक व्यक्ती येत असल्याचे पाहून हणमंत कुंभार याने पोबारा केला अशी तक्रार सदर महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे हे करत आहेत.

आरोपी जेरबंद संशयित आरोपी हणमंत कुंभार याला शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अटक केली असून, शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोपर्डी प्रकरण राज्यभर गाजत असताना सोलापूर जिल्ह्यात तेलगाव येथे दलित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी याच परिसरात तेलगाव (सीना) ता.उत्तर सोलापूर येथे दलित महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण राज्यभर गाजले होते.