शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मोहोळ पं़ स़ निवडणुक : राजन पाटील यांच्याविरोधात डोंगरे, महाडिक यांनी दंड थोपटले

By admin | Updated: January 25, 2017 18:06 IST

मोहोळ पं़ स़ निवडणुक : राजन पाटील यांच्याविरोधात डोंगरे, महाडिक यांनी दंड थोपटले

मोहोळ पं़ स़ निवडणुक : राजन पाटील यांच्याविरोधात डोंगरे, महाडिक यांनी दंड थोपटलेअशोक कांबळे - मोहोळ१९६२ साली स्थापन झालेल्या तालुका पंचायत समितीवर गेली ५५ वर्षे एकहाती सत्ता उपभोगण्यात काँग्रेस व राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. आजतागायत १३ सभापती पंचायत समितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माध्यमातून खुर्चीवर बसले आहेत. तालुक्यातील सोसायट्यांपासून ते दूध संघापर्यंत ते आमदारकीपर्यंत आजतागायत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील यांनी व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी एकहाती सत्ता ठेवण्यात यश मिळविले आहे. आजतागायत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एका बाजूला येऊन प्रत्येक निवडणुकीत लढले आहेत. तरी राष्ट्रवादीची बाजू भक्कम टिकवून ठेवण्यात या दोन्ही नेत्यांना यश आले आहे, परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे यांच्या गटाने माजी आमदार राजन पाटील यांच्याच विरोधात दंड थोपटून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे व अन्य समविचारी संघटना एकत्रित येऊन राजन पाटील यांना आवाहन केले आहे.

पूर्वाश्रमीचे कट्टर विरोधक असणारे सेना व भाजपही राष्ट्रवादीच्या विरोधात नव्या ताकदीने उभे आहेत. या सर्वांच्या विरोधकांच्या विरोधात एकला चलो रे म्हणत राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून हे आव्हान स्वीकारले आहे. अशा स्फोटक वातावरणात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आजतागायत टिकवून ठेवलेले यश पुन्हा मिळविण्यात राजन पाटील यशस्वी होणार का? की सर्व विरोधक मिळून राष्ट्रवादीची सत्ता हिसकावून घेणार का ? या निवडणुकीकडे तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.गत २०१२ साली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील राष्ट्रवादीची सत्ता रोखण्यासाठी भीमा परिवाराचे नेते धनंजय मडाडिक यांनी लक्ष घालून सेना भाजपसह सर्व पक्षांना बरोबर घेऊन आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला पंचायत समितीच्या १४ पैकी ७ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला रोखण्यात चांगले यश मिळाले होते. जिल्हा परिषदेच्या सात जागांपैकी तीन जागा मिळविण्यात यश मिळविले होते. पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी चिठ्ठी निघाली अन् भारत गायकवाड सभापती झाले होते. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीने वर्चस्व दाखवित आमदार रमेश कदम यांना निवडून आणले.---------------------------मोहोळ गट नगरपरिषदेत विलीनमोहोळ जिल्हा परिषदेचा गट हा मोहोळ नगरपरिषदेत विलीन झाला. मोहोळ नगरपरिषदेवर आजही पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आहे. एक जिल्हा परिषद गट कमी झाल्याने पंचायत समितीच्या बारा जागा व जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये आष्टी जिल्हा परिषद मतदार २७९११, अनगर जिल्हा परिषद गट मतदार २८१४८, नरखेड जिल्हा परिषद गट मतदार ३५२९५, कामती (बु.) जिल्हा परिषद मतदार ३०१४७, पेनूर जिल्हा परिषद गट मतदार ३००१७, कुरुल जिल्हा परिषद गट मतदार ३००५०, एकूण मतदार १८१५६८़-------------------------आघाडी आणि युती...गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सेना, भाजपा, काँग्रेस, रिपाइं, भीमा परिवार असे सर्वजण एकत्र होते. परंतु या निवडणुकीत तालुक्यातील सेना व भाजपाची ताकद वाढल्याने सेना व भाजपा युती करुन चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीची ताकद कमी झाली आहे.------------------------पंचायत समितीआष्टी- १४०५०, खंडाळी १३८६१, पोखरापूर १५५८४, अनगर १२५६४, नरखेड १८९५५, कोळेगाव १६३४०, सावळेश्वर १५९५०, कामती १४९१७, पेनूर -१५९८३, टाकळी १४०३४, कुरुल १५२३१, घोडेश्वर १४८१९ पंचायत समितीसाठी मतदार आहेत.----------------------सोयीनुसार निर्णयआजमितीला मनोहर डोंगरे व भीमा परिवार यांची आघाडी आहे. तर सेना-भाजपाची वेगळी आघाडी आहे. इतर मित्रपक्ष व संघटना आपल्या सोयीनुसार निर्णय घेत आहेत. सर्वच पक्षांमध्ये आपापल्या पद्धतीने व्यूहरचना आखली जात असून, राष्ट्रवादीच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वजण प्रश्न करताना दिसून येत आहेत. हे सर्व पक्ष अखेर एकत्र येऊन राष्ट्रवादीला धडा शिकविणार का, विरोधकांच्या अंतर्गत कुरघोडींचा फायदा घेत पुन्हा राष्ट्रवादीचा बोलबाला होणार का, हे चित्र आज तरी गुलदस्त्यात असून, या रंगतदार निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.