शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

करमाळ्यात मोबाईल तपासणी धडक मोहीम

By admin | Updated: June 8, 2014 00:50 IST

आक्षेपार्ह फोटो: मजकुराबाबत पोलीस सतर्क

करमाळा : महापुरुषांची अश्लिल छायाचित्रे स्टोअरेज करणे व पुन्हा ते शेअर करणे या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता़ या प्रकाराने तणाव निर्माण होत असल्याने करमाळा पोलिसांनी आज शहरात ठिकठिकाणी उभे राहून तपासणी करून अश्लिल फोटो, आक्षेपार्ह मजकूर असणाऱ्या मोबाईलधारकांची कानउघाडणी केली़ ते फोटो, मजकूर डिलीट करण्याची मोहीम राबविली.फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर महापुरुषांची अश्लिल छायाचित्रे टाकल्यानंतर राज्यात गेल्या आठवड्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या मोबाईलवरून हॉट्सअप व एसएमएसद्वारे ही अश्लिल चित्रे स्टोअर करून पुन्हा एकमेकांना ती शेअर करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परिणामी कायदा सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील यांनी आज बसस्थानक, सुभाष चौक, बायपास रस्ता, भवानी चौक आदी ठिकाणी पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक भुवनेश्वर घनदाट यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलची तपासणी करून आक्षेपार्ह छायाचित्रे व मजकूर स्टोअर आहे का याची खात्री करून तपासणी केली व ज्यांच्या मोबाईलमध्ये असे आक्षेपार्ह चित्रे व मजकूर आढळून आला त्यांची कानउघडणी करण्यात आली़ ही मोहीम सायंकाळपर्यंत चालूच होती. ----------------------------मोबाईलमध्ये आलेल्या महापुरुष व राजकीय नेत्यांचे अश्लिल छायाचित्रे व मजकूर स्टोअर करून ठेवू नये अथवा तो दुसऱ्या कोणा व्यक्तीला शेअर करू नये यामुळे विनाकारण तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- अनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी