शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात

By admin | Updated: January 31, 2017 17:31 IST

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यातकुर्डूवाडी : आॅनलाईन लोकमत मुंबईत भाजपा-शिवसेनेची युती तुटल्याने माढा तालुक्यात आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात ‘महायुती’ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला वेगळी चूल मांडण्याचे आदेश पक्षाकडून मिळाले आहेत.माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा फिवर सध्या गावोगावी वाढत असून ज्यांना नेत्यांनी कानमंत्र दिला आहे, त्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात गाठीभेटी वाढविल्या आहेत; मात्र व ज्या इच्छुकांना उमेदवारीची खात्री नाही त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत नेत्यांजवळ फिल्डिंग सुरू ठेवली आहे.सर्वच वरिष्ठ नेते आपला कार्यकर्ता इतर पक्षात जाऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच पत्ते उघडण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण पुरुष असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. आ.शिंदे बंधू विरोधात सर्वपक्षीय महायुती असे एकंदर चित्र रंगले होते; मात्र शिवसेना व भाजपा या पक्षांचा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काडीमोड झाला त्याचे पडसाद माढा तालुक्यात उमटतात का याची उत्सुकता लागली आहे. पक्षीय आदेश म्हणून शिवसेनेची वेगळी चूल मांडण्यात येणार आहे त्याबाबत जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत.भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी पुढाकार घेत सर्व विरोधकांना एकत्र करून मोट बांधण्याच्या कामात आघाडी घेतली होती; मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ.धनाजीराव साठे, शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, जि.प.चे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर, विजय शुगरचे संचालक भारत पाटील, तालुका पंचायत समितीचे सदस्य भारत शिंदे यांनी एकत्र चर्चा केली पण भूमिका मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे; मात्र हे नेते एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मानेगाव गटातील उमेदवारीवर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.शिवसेनेचे संपर्कमंत्री खा. राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आ.तानाजीराव सावंत हे जो आदेश देतील तो आम्ही पाळू, असे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षानेही सध्या ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे; मात्र वरिष्ठ पातळीवरुन राष्ट्रवादीशी आघाडी झाल्यास रणनीतीत बदल करावा लागणार आहे.------------------------काही जागांचा तिढा कायमआ. बबनराव शिंदे यांनी कारखान्यावर प्रत्येक गावातील नेत्यांना बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर काही उमेदवार फायनल केले; मात्र काही जागांचा तिढा अजूनही कायमच आहे. एक नाव पुढे केले की, तो उमेदवार नको म्हणून सांगणारा वर्ग अचानकच पुढे येत असल्यामुळे सर्वांचा मेळ आ. शिंदे कसे घालतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.