पत्रकारांशी संवाद साधताना सातपुते म्हणाल्या, ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करून काम करणारे पत्रकार यांचे काम कौतुकास्पद आहे. समाजात सध्या नकारात्मक घटना वाढत आहेत. मात्र, नकारात्मक घटना असूनही त्यातील सकारात्मक बाजू समाजापुढे मांडण्याचे काम पत्रकार करू शकतो. जेवढी सकारात्मक पत्रकारिता होईल, तेवढे सामाजिक स्वास्थ्य मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे,
प्रा. अशोक नरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
०३करमाळा-सातपुते
करमाळ्यात पत्रकार संघाच्या कार्यलयात जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचा सत्कार करताना महेश चिवटे, शेजारी पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे.