शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्ड फ्लू’विरोधात यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:55 IST

सोलापूर : कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला. मात्र, इतर देशांत कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्लूं ...

सोलापूर : कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेला पोल्ट्री व्यवसाय गेल्या चार महिन्यांत बऱ्यापैकी सावरला. मात्र, इतर देशांत कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्लूं हा संसर्गजन्य आजार पसरला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील ९१ पशुधन विकास अधिकारी आणि १४२ पर्यवेक्षक पोल्ट्री व्यावसायिकांशी संपर्क साधून आढावा घेत आहेत.

पक्षी आणि अंड्यांना चांगला दर मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघत असतानाच, आता ‘बर्ड फ्लू’चे संकट घोंगावत आहे. या स्थितीत पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय १२ पथके नेमली आहेत. पशुसंवर्धन उपायुक्तही याचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यात २३ लाख कोंबड्यांची पशुसंवर्धन विभागाकडे नोंद आहे. या संसर्गजन्य आजारावर पोल्ट्री व्यावसायिक खबरदारी घेत आहेत. दररोजची स्वच्छता आणि सॅनिटायझर केले जाते. ७३ सदस्यांची एक कमिटी असून, यामध्ये बहुतांश पशुवैद्यक अधिकारी आहेत.

कोणताही फ्लू आला तर त्याचा पहिला बळी पोल्ट्री व्यवसायच ठरतो, असे समीकरणच तयार झाले आहे. मार्चमध्ये आलेल्या कोरोनावेळीदेखील चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, असा अपप्रचार झाला आणि काही ठिकाणी पोल्ट्री व्यावसायिकांनी जिवंत कोंबड्या गाडून टाकल्या. काहींनी मोफत वाटल्या. कोरोनाने या व्यवसायाला पूर्वार्धाच्या टप्प्यात उद्‌ध्वस्त केले तरी, उत्तरार्धात मात्र चिकन आणि अंडी खाऊनच कोरोनाशी लढता येते, असा प्रचार झाल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा स्थिर होत होता. २०१७-१८ मध्ये राज्यात ‘बर्ड फ्लू’ने थैमान घातले होते. दक्षता म्हणून अनेक व्यावसायिक निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवीत आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जातेय काळजी

* बर्ड फ्लूच्या धर्तीवर ७३ सदस्यांचा एक नियंत्रक विभाग उभारला आहे.

* ९१ पशुधन विकास अधिकारी आणि १४२ पर्यवेक्षक हे व्यावसायिकांकडून दररोज आढावा घेतात.

* ग्रामपंचायत पातळीवर मार्गदर्शक सूचना लावल्या आहेत. आजाराची लक्षणे सांगितली असून, ती दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले, तसेच वनविभागाशीही संपर्क साधून सूचना केल्या आहेत.

मृत पक्षी आढळल्यास तात्काळ कळवा

‘बर्ड फ्लू’ हा सर्दीसारखा आजार आहे. कोंबड्यांना सर्दी होऊन त्यांचा श्वास गुदमरतो आणि त्या गतप्राण होतात. लसीकरण त्यावर उपाय आहे. असे पक्षी आढळल्यास जिल्हा पशुसंर्वधन विभागाशी अथवा तालुका पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---

काही दिवसांपूर्वी उजनी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये दौरा केला. येथे खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. अद्यापपर्यंत ‘बर्ड फ्लू’चे एकही प्रकरण पुढे आले नाही.

नवनाथ नराळे, पशुसंवर्धन अधिकारी