शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव

By admin | Updated: September 2, 2014 16:40 IST

शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीला काम करण्याची संधी द्यावी म्हणून महापौर अलका राठोड यांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईवर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले.

सोलापूर : शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीला काम करण्याची संधी द्यावी म्हणून महापौर अलका राठोड यांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईवर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. महापौर राठोड यांनी सोमवारी दुपारी महापौर निवासस्थानी कचर्‍यासंदर्भात अधिकारी, पदाधिकारी व संबंधित ठेकेदाराची बैठक घेतली. बैठकीला सभागृह नेते संजय हेमगड्डी, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री, महिला व बालकल्याण सभापती खैरूनबी शेख, अँड. यु. एन. बेरिया, दिलीप कोल्हे, आनंद चंदनशिवे, आयुक्त गुडेवार, सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे, प्र. आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते. महापौर राठोड यांनी शहरातील कचर्‍याची स्थिती बिकट झाली आहे. सण, उत्सव आहेत. महापालिकेने बिले दिली नसल्याने समीक्षा सक्षमपणे काम करू शकत नाही. प्रशासनाने ठेकेदाराला संधी द्यावी, अशी सूचना केली. त्यावर आयुक्त गुडेवार यांनी सभेत यावर चर्चा होऊन कारवाईचा ठराव मंजूर झाल्याचे निदर्शनाला आणले. त्यावर महापौरांनी ठेकेदाराशी चर्चा तरी करा असा हट्ट धरला. त्यावर आयुक्तांनी ठेका कोणी घेतला ती व्यक्ती अद्याप समोर आली नाही असे सांगितले. त्यावर महापौरांनी बैठकीत असलेल्या राठोड नावाच्या व्यक्तीबरोबर चर्चा करण्यास सांगितले. त्यावर आयुक्त गुडेवार यांनी याला आक्षेप घेतला. जी व्यक्ती समोर आहे ती ठाणे महापालिकेत कामाला आहे. या व्यक्तीबरोबर मी चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतली. ठेका रवींद्र राठोड या व्यक्तीने घेतला आहे ती व्यक्ती समोर आली पाहिजे असे ठणकावून सांगितले. त्यावर महापौरांनी तुम्ही बोलत नसाल तर इतर अधिकार्‍यांना सांगा असे सुचवूनही आयुक्त ठाम राहिले. त्यामुळे रवींद्र राठोड ठेकेदार बैठकीसमोर हजर झाला. त्याला आयुक्तांनी करारातील अटी व शर्ती विचारल्या. पण त्याला व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. पूर्वीची बिले सादर करा. नियमाप्रमाणे काम झालेच पाहिजे असे आयुक्तांनी ठणकावून सांगितल्यावर काम करण्याचे ठेकेदाराने आश्‍वासन दिले. कचरा उचलण्यासंदर्भात महापौरांनी सूचना कराव्यात, ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणे गैर आहे अशी प्रतिक्रिया आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली. त्यावर सभागृह नेते हेमगड्डी, अँड. बेरिया यांनी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी अशी सूचना केली. (प्रतिनिधी)