शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयात मनीमाऊ करते चोवीस तास ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST

दोन वर्षांपूर्वी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिलेली मनीमाऊ एकेदिवशी कार्यालयात आली अन‌् कर्मचाऱ्यांच्या प्रेमाखातर आपला मुक्काम कार्यालयातच कायम केला. कार्यालयाच्या ...

दोन वर्षांपूर्वी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिलेली मनीमाऊ एकेदिवशी कार्यालयात आली अन‌् कर्मचाऱ्यांच्या प्रेमाखातर आपला मुक्काम कार्यालयातच कायम केला. कार्यालयाच्या सर्व विभागात ही मनीमाऊ बिनधास्तपणे वावरते. ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्येही तिची लुडबूड असते. आसपासच्या शेतात फिरून शिकारीबरोबरच कार्यालयातील उंदरांचाही बंदोबस्त करत जेवणाच्या सुटीत कर्मचाऱ्यांबरोबर आपली न्याहरीही घेते, असा तिचा दिनक्रम ठरलेला असतो.

लॉकडाऊन काळातच चिंताग्रत

कोरोना महामारी, संचारबंदी काळात कार्यालयातील वर्दळ पूर्णपणे ठप्प झाली होती. या काळातच मनीमाऊला चुकल्यासारखे वाटे. कार्यालयात कर्मचारी येण्याची वाट बघत बसे. तिला दूध, चपाती, बिस्कीट खायला देऊन कार्यालय पुन्हा बंद होत असे. या काळात माणसांची वर्दळ थांबल्यामुळे मनीमाऊ चिंताग्रस्त दिसत होती.

कोट ::::::::::::::::::::::::::::::

आमचं कार्यालय शेतात असल्यामुळे या कार्यालयात पूर्वी उंदरांपासून त्रास होत होता. मांजर इथं असल्यापासून कार्यालयाकडे कधीही उंदरं फिरकले नाहीत. त्याला सवय लागल्यामुळे सर्व कार्यालयात मांजर बिनधास्तपणे वावरते.

- गजानन ननावरे

तालुका कृषी अधिकारी

फोटो ::::::::::::::::::::

माळशिरस तालुका कृषी कार्यालयासमोर बसून असलेली मनीमाऊ.