शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

मांगीची एमआयडीसी लालफितीच्या कारभारात अडकली १७ वर्षांपासून उद्योजक प्लॉटपासून वंचित

By admin | Updated: May 10, 2014 00:23 IST

करमाळा : तालुक्यातील सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळवून देणारी मांगीची एम.आय.डी.सी़ लालफितीच्या कारभारात अडकली असून, जागा संपादन करून तब्बल १७ वर्षे झाली, पण अद्याप उद्योजकांना प्लॉटच वाटप न झाल्याने व एम.आय.डी. सी़ मध्ये पायाभूत सोयी-सुविधा न दिल्याने तालुक्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे. करमाळा- अहमदनगर राज्य मार्गावरील मांगी गावच्या शिवारात १९९६

करमाळा : तालुक्यातील सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळवून देणारी मांगीची एम.आय.डी.सी़ लालफितीच्या कारभारात अडकली असून, जागा संपादन करून तब्बल १७ वर्षे झाली, पण अद्याप उद्योजकांना प्लॉटच वाटप न झाल्याने व एम.आय.डी. सी़ मध्ये पायाभूत सोयी-सुविधा न दिल्याने तालुक्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे.करमाळा- अहमदनगर राज्य मार्गावरील मांगी गावच्या शिवारात १९९६ मध्ये राज्य शासनाच्या औद्योगिक विकास महामंडळामार्फत एम.आय.डी.सी़ मंजूर झाली.यासाठी ५० हेक्टर जमीन १९९७ मध्ये संपादित करण्यात आली. यामध्ये २२ हेक्टर क्षेत्र शासनाच्या मालकीचे तर उर्वरित २८ हेक्टर क्षेत्र शेतकर्‍यांच्या खाजगी मालकाचे संपादित करण्यात आले. संपूर्ण जमीन संपादित केल्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर प्लॉटचे मोजमाप करून प्लॉट पाडण्यात आले.या एम.आय.डी.सी़ मध्ये गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्यात अंतर्गत मुरूमाचे रस्ते,स्ट्रीट लाईट करण्यात आले, पण पाण्याची सोय झालेली नाही.शासकीय आय.टी.आय़,वसतिगृह व वीज मंडळाच्या १३२ के.व्ही.उपकेंद्रास जागा हे दोनच प्लॉट एम.आय.डी.सी़ ने वाटप केलेले असून त्या व्यतिरिक्त एकाही उद्योजकास प्लॉट वाटप झालेले नाही.मांगीच्या एम.आय.डी.सी. मध्ये प्लॉट घेऊन उद्योग सुरू करण्यासाठी शेकडो सुशिक्षित तरूण तयार आहेत. पण येथे पाणी, वीज,रस्ते आदी सोयी सुविधा दिल्या गेल्या नाहीत. वार्ताहर---------------------------------------------------------मांगी एम.आय.डी.सी़ मध्ये उद्योग उभा करण्यासाठी प्लॉट पाहिजे आहे.त्यासाठी महामंडळाच्या सोलापूर,सांगली या कार्यालयाशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नाही़ गेल्या दीड वर्षापासून ते सांगतात की ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील शिवाय दैनिक वर्तमान पत्रातून जाहिरात प्रसिध्दीनंतर प्लॅाट दिले जाणार आहेत एवढेच सांगितले जात आहे असे नवउद्योजक संजय घोलप यांनी सांगितले.