आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : रजा रोखीकरणाचे बील तयार करून देण्याकरिता २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना संदीप चंद्रभान कोळी (वरिष्ठ सहाय्यक वर्ग ३, पंचायत समिती, माळशिरस जि़ सोलापूर) यांना अटक केली आहे़ याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली़
माळशिरस पंचायत समितीतील कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक
By admin | Updated: July 13, 2017 15:22 IST