शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजीला आत्महत्या करायला लावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

संशयित मोबाईलच्या लोकेशनवरुन सापडला करमाळा : गुळसडी येथील शाळेतील शिक्षक बळीराम वारे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला ...

संशयित मोबाईलच्या लोकेशनवरुन सापडला

करमाळा : गुळसडी येथील शाळेतील शिक्षक बळीराम वारे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

करमाळा येथील गणेश नगरमध्ये राहणारे शिक्षक वारे हे गुळसडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. या गावात जमिनीचा १४ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार होऊनही जमिनीचा कब्जा न देता रमेश मोहन यादव व हनुमंत बागल दमबाजी करत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून सहशिक्षक बळीराम वारे यांनी २२ जुलैला पहाटे आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी वारे यांनी या आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार या दोघांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदला होता. गुन्हा दाखल झाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी संशयित आरोपीचा शोध घेतला, पण दोघे घरी नव्हते. त्यानंतर मोबाइल लोकेशन तपासले. त्यापैकी रमेश यादवचे ठिकाण सापडले. पोलिसांनी त्यास तत्काळ पकडून अटक केली. शुक्रवार (ता. २३) रोजी संशयितास न्यायालयात न्यायाधीश शिवरात्रे यांच्यासमोर हजर केले असता, या आरोपीस २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

---