शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक वारी निर्मभ व भक्तीमय करा, अतुल भोसले, पंढरपूरात कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 17:57 IST

कार्तिक वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता कामा नये़ त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे़ सर्व अधिकाºयांनी आपल्याला दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी

ठळक मुद्देकार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणारकॅनडा सरकारच्या ली असोसिएटचे अधिकारी सध्या पंढरपूरमध्ये दाखल कार्तिकी यात्रा काळात ते शहराची पाहणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : कार्तिक वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास न होता कामा नये़ त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे़ सर्व अधिकाºयांनी आपल्याला दिलेली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी आणि ही वारी निर्मळ अन् भक्तीमय होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी केले़पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रशासकीय अधिकाºयांच्या कार्तिकी यात्रा आढावा बैठकीत ते बोलत होते़ या बैठकीस प्रांताधिकारी डॉ़ विजय देशमुख, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, सहा़ पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. टी. राऊत, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, मुख्यधिकारी अभिजीत बापट, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, नपाचे प्रशासन अधिकारी सुनील वाळूजकर, न.पा़ चे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल जोशी, मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक रवींद्र वाळूजकर, मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, सचिन अधटराव, सदस्या शकुंतला नडगिरे आदी उपस्थित होते.कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगून डॉ़ अतुल भोसले म्हणाले, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंदिर समितीच्या वतीने वारकºयांसाठी पाण्याचे एटीएमचे, प्रायोगिक तत्वावरील टोकन दर्शन सुविधेचे आणि सुलभ स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे़याशिवाय सार्व़ बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कासेगाव ते तनाळी या ६ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे़ मंदिर समितीचे अध्यक्ष फक्त मंदिराच्या विकासाकडेच लक्ष देतात असे कोणाला वाटू नये म्हणून आपण शहर, तालुक्याच्या विकासाकडे देखील लक्ष देत आहोत, असे डॉ. भोसले यांनी सांगितले़बैठकीनंतर डॉ़ अतुल भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व मंदिर समितीच्या अधिकाºयांनी मंदिर परिसर आणि शहरातील विविध भागांची पाहणी केली़कॅनडा सरकारच्या ली असो़ चे अधिकारी पंढरीतकॅनडा सरकारच्या ली असोसिएटचे अधिकारी सध्या पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत़ कार्तिकी यात्रा काळात ते शहराची पाहणी करणार आहेत़ वारीसाठी देशभरातून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात़ तेव्हांची गर्दी कशी असते आणि आलेल्या भाविकांना कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत, याबाबतची नोंदी ते घेणार असल्याचे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले. सहअध्यक्षाचा निर्णय अभिनंदनीयराज्य सरकारने मंदिर समितीला सहअध्यक्ष नेमण्याचा जो निर्णय घेतला तो खरोखरच अभिनंदनीय आहे़ मंदिर समितीचा आवाका पाहिल्यास आणि शहराच्या विकासासाठी हे पद असणे आवश्यक होते़ यामुळे आता मंदिर परिसर आणि शहरातील विकासकामांना गती येईल, असे डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले़