कंदर (जि़ सोलापूर) : लग्न मुहूर्तावर मंगलाष्टक झाल्यानंतर वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालत असतानाच एकाने मंडपात घुसून नवरीच्या गळ्यात हार घातल्याने एकच खळबळ उडाली. शनिवारी सायंकाळी ६.१५ वा. गोरज मुहूर्तावर नियोजित लग्नसोहळा पार पडत असताना ही घटना घडली. वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालत असतानाच अचानक स्टेजवर आलेल्या नामदेव भगवान ठोंबर (केत्तूर न. १, ता. करमाळा) याने बळजबरी करत वराच्या हातातील हार हिसकावून घेत वधूच्या गळ्यात घातला. या घटनेने लग्न मंडपात एकच हलकल्लोळ उडाला. वºहाडींनी नामदेवला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. वधूच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
लग्न मंडपातच नववधूचा विनयभंग; हार हिसकावून घातला वधूच्या गळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:00 IST