शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या प्रचारावर करडी नजर

By admin | Updated: January 31, 2017 17:19 IST

सोशल मीडियाच्या प्रचारावर करडी नजर

सोशल मीडियाच्या प्रचारावर करडी नजरकरमाळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात येत असून फेसबुक, टिष्ट्वटर व्हॉट्सअ‍ॅपव्दारे उमेदवाराचा प्रचार करण्याअगोदर निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुुपवर उमेदवाराचा प्रचार विनापरवानगीने केला गेला व त्यासंदर्भात तक्रार आली तर ग्रुप अ‍ॅडमिन व ज्याने पोस्ट टाकली त्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय पवार यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवास खर्चाची मर्यादा ३ लाख रुपये असून पंचायत समितीच्या निवडणुकीत उभा राहणाऱ्या उमेदवारास खर्चाची मर्यादा २ लाख रुपये आहे.तर उमेदवारी अर्ज भरताना शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया खुल्या वातावरणात व पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहिता नियमाची काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी उमेदवार व कार्यकर्त्यांची आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवाराने ३ लाख रुपयापर्यंत तर पंचायत समितीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवाराने २ लाख रुपये पर्यंतच खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे. निवडणुकीस उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने स्वत:च्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यातून चेकद्वारा खर्च करावयाचा आहे.केलेल्या खर्चाचा हिशोब रोजच्या रोज निवडणूक शाखेकडे देणे उमेदवारास बंधनकारक आहे.--------------------स्वतंत्र कक्ष उघडणारजिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी व आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक शाखेत सोशल मीडिया, प्रचार, प्रसार यासाठी स्वतंत्र कक्षा उघडण्यात येणार आहे. त्याव्दारे उमेदवार त्याचे समर्थक कार्यकर्ते यांचा प्रचार, सभा या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी प्रचारमाध्यमातून खोटा, बदनामीकारक प्रचार केला गेला तर त्यावर लगेच कारवाई करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रेस मीडियात उमेदवाराचा केलेला प्रचार याकडेही या शाखेचे लक्ष असणार असून उमेदवाराने प्रचार व प्रसिद्धी माध्यमाद्वारे केलेल्या प्रचाराचा खर्च निवडणूक शाखेकडे देणे बंधनकारक आहे.----------------------शौचालय वापरत असल्याच्या प्रमाणपत्राची अट.. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडे शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून त्या उमेदवाराने प्रमाणपत्र घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबत दाखल करावे या आशयाचे परिपत्रक जारी झाले आहे. स्वत:च्या मालकीचे अथवा भाड्याच्या घरात राहत असल्यास त्या घरात शौचालय आहे की सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहे असे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.