आॅनलाइन लोकमत सोलापूरकुसळंब दि २७ : बार्शी तालुक्यातील कारी येथे पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत आलेली असताना तलाठी हे आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयास चक्क टाळे ठोकुन निषेध नोंदवला आहे.कारी येथील असलेल्या गावकामगार तलाठी कार्यालया अंतर्गत कारी,गोरमाळे, भानसगाव,घोळवेवाडी, नारी अंबेजवळगे गुंजेवाडी येथील शेतकºयांचे शेतीचे कामकाज चालते़ जवळपास ४००० खातेदार कारी गावकामगार तलाठी कार्यलयाशी सबंधीत असुन सध्या पिक विमा भरण्यासाठी शेतकरी बांधवाची मोठी धावपळ सुरू आहे. पिक विमा भरण्यासाठी मुदत अवघ्या काही दिवसावर आलेली असताना तलाठी मात्र येत नसल्यामुळे शेतकºयांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.याबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असता तलाठी हे कारी सज्जा कारी येथे गेले आहेत़ मात्र तलाठी आठ दिवसांपासून कारीकडे फिरकलेच नाहीत म्हणून संतप्त झालेले शेतकरी अमोल जाधव ,लालासाहेब बोधले, कालिदास घोळवे,मनोज डोके यांनी व अनेक गावच्या शेतकºयांनी कार्यालयास कुलूप ठोकले़
कारी गावात तलाठी कार्यालयास शेतकºयांनी ठोकले कुलूप
By appasaheb.dilip.patil | Updated: July 27, 2017 14:49 IST
कुसळंब दि २७ : बार्शी तालुक्यातील कारी येथे पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपत आलेली असताना तलाठी हे आठ दिवसांपासून तलाठी कार्यालयात येत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी कार्यालयास चक्क टाळे ठोकुन निषेध नोंदवला आहे.
कारी गावात तलाठी कार्यालयास शेतकºयांनी ठोकले कुलूप
ठळक मुद्देमागील आठ दिवसांपासून तलाठी फिरकेनापीकविमा भरण्यासाठी शेतकºयांना अडचणतहसिल कार्यालयाचे दुर्लक्ष