शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमध्ये ड्रायव्हर गावाकडे आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST

नासीर कबीर करमाळा : लॉकडाऊनने साऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले... अनेकांची रोजीरोटी बंद झाली. बाळेवाडीच्या नितीन लोंढेचेही अगदी तसेच काहीसे. ...

नासीर कबीर

करमाळा : लॉकडाऊनने साऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले... अनेकांची रोजीरोटी बंद झाली. बाळेवाडीच्या नितीन लोंढेचेही अगदी तसेच काहीसे. पुण्यात ड्रायव्हर म्हणून कामाला. गावात मिळेल ते काम करून लोकांचा विश्वास संपादन केला. काहीवेळा संघर्षही झाला. तशातच निवडणूक आली. त्यात तो जिंकलाही अन्‌ आरक्षणात त्याला चक्क सरपंचपद अर्थात ‘गावकारभारी’ म्हणून सेवा करण्याची संधी चालून आली आहे.

खरे तर लॉकडाऊनमध्ये नितीन हनुमंत लोंढे नावाचा युवक पुण्याहून बाळेवाडीला आला... पुण्यात एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गावात राहू लागला. चांगल्या स्वभावामुळे आणि गोड बोलण्यामुळे तो सर्वांत मिसळून गेला आणि नितीन गावाचा मित्र झाला. मिळेल ते काम करू लागला. शेतात उडीद, तुरी पेरल्या... चांगले उत्पादन मिळाले.

त्याला मंजूर झालेले रमाई घरकुल, घर बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे जुने घर पाडले; पण त्याच्या घरकुलाला तांत्रिक अडचण काढून मागच्या कारभारी लोकांनी अडवणूक केली. तरी त्याने जिद्द सोडली नाही.

अशातच गावात निवडणूक लागली. दलित वस्तीने एकमुखाने नितीनच्या नावाची शिफारस केली. बाकी गावानेही सूचना मान्य केली. गावातून त्याच्याविरोधात कुणी अर्ज भरायला पुढे आले नाही. मग पुण्यातून एका त्याच्या भावकीतल्या माणसाला पटवून विरोधकांनी उभे केले. तरीही गडी मागे हटला नाही. तो प्रचार करत होता. गाठीभेटी घेत राहिला. जवळ पैसा नव्हता, कारण लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. प्रतिस्पर्धी पॅनलने पुण्याहून येणाऱ्या मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली; पण सुग्रीव नलवडे आणि हर्षवर्धन नलवडे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याच्या स्वभावामुळे लोकांनी प्रतिस्पर्धी लोकांचे पैसे घेऊनही नितीन लोंढेलाच विजयी केले. सुदैवाने आरक्षण पडले आणि तो सरपंच झाला. आता तो गावकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालाय.

लोकांसाठी झटतोय अन्‌ झटणार; गावकऱ्यांचा विश्वास

पण हा माणूस याची अडवणूक जरी झाली असली तरी तो लोकांची अडवणूक करणारा नाही. तो शिकलेला आहे. त्याने जग पाहिलेय, त्याने विकास पाहिलाय. तो सगळ्यांना सोबत घेऊन गाव पुढे नेईल. तो गावाच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर झालाय. लोकशाहीच्या उत्सवात नितीन लोंढे सामील झाला. लोकांसाठी तो झटतोय, तो गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवणार यात शंका नाही, असा विश्वास लोकांमधून व्यक्त होऊ लागला आहे.

फोटो : नितीन लोंढे