आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि २४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफ झालेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकºयांची यादी शासनाच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवरून सोमवारी गायब झाली. यामुळे बँक, सहकार खाते व शेतकºयांमध्ये दिवसभर गोंधळ सुरू होता.राज्य शासनाने थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांची कर्जमाफी केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ८ लाख ४० हजार शेतकºयांची चार हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असून ही रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यावर सोमवार व मंगळवारी जमा करण्यात येईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले होते. सोलापूर जिल्ह्यातील चार हजार ६८ शेतकºयांची कर्जमाफी झाल्याचे शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले होते. शासनाच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी-३, सांगोला, सरकोली, कंदलगाव, कोर्टी व तिºहे शाखेंतर्गत विकास सोसायट्यांच्या चार हजार ६८ शेतकºयांची यादी शनिवारी दिसत होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने कोणी सहसा आपलं सरकार पोर्टलकडे पाहिले नाही. सोमवारी मात्र अनेक शेतकºयांनी आपलं सरकार पोर्टलवरील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी आपली नावे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवसभर शासनाची ही साईट बंदच होती. त्यामुळे शेतकºयांनी बँक व सहकार खात्याच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता ज्याच्या त्याच्या सोईने उत्तरे मिळाली. सोलापूरचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता शेतकºयांच्या यादीत सुधारणा करण्यात येणार असल्याने तूर्त यादी साईटवरून काढल्याचे सांगितले.---------------------------उपसमितीची आज बैठकच्कर्जमाफीसाठी अर्थ विभागाने ३ हजार ८०० कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी शेतकरी सन्मान योजनेच्या खात्यावर जमा केली असल्याचे सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी बैठक होणार असून मंगळवारी कर्जमाफीची सुधारित यादीही पोर्टलवर टाकण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.-----------------------च्राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकºयांना कर्जमाफ झाल्याचे प्रमाणपत्र १८ आॅक्टोबर रोजी देण्यात आले होते. त्या शेतकºयांच्या नावावरील कर्ज बेबाक करून तसा दाखला देण्यात यावा व शासनाकडे रकमेची मागणी करावी, असे पत्र त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधकांनी बँकांना दिले आह
आपले सरकार पोर्टलवरील कर्जमाफीच्या शेतकºयांची यादी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:10 IST
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफ झालेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकºयांची यादी शासनाच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवरून सोमवारी गायब झाली.
आपले सरकार पोर्टलवरील कर्जमाफीच्या शेतकºयांची यादी गायब
ठळक मुद्देसहकार खाते व शेतकºयांमध्ये दिवसभर गोंधळ सुरू दिवसभर शासनाची ही साईट बंदचउपसमितीची आज बैठक