शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

४० गावांतील बत्ती गुल; १९ तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST

जूनच्या पहिल्या दिवसापासून सलग पाऊस पडत आहे. थोडा पाऊस झाला तरी लगेच विद्युतपुरवठा खंडित होतो. या महिन्यात शहरासह ग्रामीण ...

जूनच्या पहिल्या दिवसापासून सलग पाऊस पडत आहे. थोडा पाऊस झाला तरी लगेच विद्युतपुरवठा खंडित होतो. या महिन्यात शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून, तांत्रिक बिघाडाची तातडीने दुरुस्ती करण्यात येत असल्याचे महावितरणच्या कार्यालयातून सांगण्यात येते. परंतु वीज समस्येमुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत.

वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील काही ठिकाणी वीजतारा, खांब पडत असल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. पावसामुळे शहरातील काही भागातील खंडित वीजपुरवठा दुरुस्त करण्यात यश आले. शहर व ग्रामीण भागातही वीज यंत्रणेच्या दुरुस्तीची व देखभालीची कामे सुरू असल्याने वीजपुरवठ्याची समस्या लवकरच सुटेल, असे महावितरणकडून स्पष्ट केले आहे.

ग्रामीणमध्ये विजेचा लपंडाव

तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह ग्रामीण भागात पाऊस सुरू झाल्यानंतर वीज जाण्याचे प्रकार घडले आहेत. बहुतांश ग्रामीण भागात तर १५-१५ तास वीज नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ही समस्या सोडवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या बरेचशे कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत असून काही रुग्णांना ऑक्सिजन घरीच लावले जात आहेत. अशा स्थितीत जास्त वेळ विद्युतपुरवठा खंडित होण्यामुळे रुग्णांच्या जीवाची घालमेल होत आहे. महावितरणच्या टीमने अशा परिस्थितीत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे विकास पुजारी यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व कामांचा फज्जा

पावसाळ्यात वीजप्रवाह खंडित होऊ नये, यासाठी महावितरणतर्फे मान्सूनपूर्व कामे हाती घेतली होती. शहरासह ग्रामीण भागात विजेच्या तारांमध्ये अडकणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू केले होते. प्रत्यक्षात मात्र मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होताच वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने महावितरणने देखभालीच्या केलेल्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कोट ::::::::::::::::::::

तालुक्यातील विविध भागात वीज वाहिन्या व यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर त्या तातडीने सोडवण्यात येत आहेत. वीजसेवा खंडित झाल्यास नागरिकांनी तत्काळ महावितरण कार्यालयात माहिती द्यावी. शहरासह ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येतील.

- संजय शिंदे

उपकार्यकारी अभियंता, महावितरण