|
सोलापूर : सोलापूरला पाणीपुरवठा करणार्या औज बंधार्यातील पाणीपातळी खालावली असून, पंधरवड्यात उजनीतून पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे. टाकळी येथील पंपगृहाला औज बंधार्यातून पाणी उपलब्ध होते. या बंधार्यातील पाणीपातळी दीड मीटरवर खाली आहे. यातून एक महिना शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी उजनीतून सोडलेले पाणी पोहोचण्यास पंधरा दिवस कालावधी लागतो. साडेचार मीटर बंधारा भरला तर अडीच ते तीन महिने पाणीपुरवठा होतो. आषाढी यात्रेच्या वेळी पाणी सोडण्यात आले होते. महिनाभर कडाक्याचे ऊन पडल्याने पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे. निवडणुकामुळे पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही. अद्याप नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाची रचना होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. हे जर लवकर नाही झाले तर मात्र सोलापूरकरांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी) |
औज बंधार्यातील पातळी खालावली
By admin | Updated: October 23, 2014 14:44 IST