शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

माझ्या वडिलांचं तैलचित्र करून द्यावं, बाबासाहेबांच्या 'त्या' पत्राची शंभरी!

By रवींद्र देशमुख | Updated: May 8, 2023 11:37 IST

सोलापुरात संग्रही: कोल्हापूरचे चित्रकार दत्तोबा दळवी यांना केली होती विनंती.

सोलापूर -  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांची चित्रस्मृती अखंड आपल्यासोबत ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी त्यावेळचे कोल्हापुरातील प्रख्यात चित्रकार दत्तोबा दळवी यांना पत्राद्वारे वडिलांचे तैलचित्र काढण्याची विनंती केली होती..या पत्राला सोमवारी, 8 मे 2023 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.

दत्तोबा दळवी हे शाहू महाराजांच्या दरबारी चित्रकार होते. चित्रकलेत त्यांचा लौकिक मोठा होता. लोकराजाची दत्तोबांवर विशेष मर्जी होती. शिवाय बाबासाहेबांशी त्यांचा स्नेह होता. त्यावेळी दत्तोबा यांनी मुंबईतील सर जे. जे. महाविद्यालयातून सुवर्णपदक पटकाविले होते.डॉ. आंबेडकर यांनी मुंबईतील परळ येथून 8 मे 1923 रोजी दत्तोबांना हे पत्र लिहिले. सोलापुरातील पंख्यात वकिल धनंजय माने यांच्या पत्नी रेखा माने या दत्तोबा दळवी यांची नात आहे. त्यांच्या संग्रही हे पत्र आहे. 

पत्रात विनम्रता..डॉ. आंबेडकर हे विद्वान होते. अनेक शास्त्रांचे ते तज्ञ होते. पण त्यांची विनम्रता, विनशीलता ही आदर्शवत.नेमके त्याचेच दर्शन या पत्रात झाले आहे.  वडिलांचे तैलचित्र काढण्यास सांगताना ते लिहितात की, 'मी आपणाला तसदी देत आहे. याबद्दल माफी करणे.' बाबासाहेब इतके मोठे नेते असताना ते कलाकाराला मोठेपण देतात अन पत्रात म्हणतात,' आपल्या दर्शनाचा लाभ लवकरच होईल अशी आशा करतो.बाबासाहेबानी पवार नावाच्या व्यक्तिकरवी दत्तोबा दळवी यांना हे पत्र दिले आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या वडिलांचा फोटोही दिला आहे. तैलचित्राबाबत काही सूचना देताना त्यांनी त्याचा आकार ठरविण्याचा अधिकार दत्तोबा यांनाच दिला आहे.