शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांकडून कोल्हापूरची उपेक्षाच

By admin | Updated: December 24, 2015 00:32 IST

हाती आरक्षण केंद्रच : ‘एमटीडीसी’चे उपप्रादेशिक कार्यालय सोलापूरला

कोल्हापूर : पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोल्हापूरलाच महत्त्व आहे; पण राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापुरातून बंद केलेले महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) प्रादेशिक कार्यालय पुन्हा सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण आता नवीन उपप्रादेशिक कार्यालय सोलापूरला सुरू करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून मंजुरीची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे कोल्हापूरला फक्त आरक्षण केंद्रावरच समाधान मानावे लागणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीत सोलापूरला नवीन उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर हे परिपूर्ण असतानाही येथील ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक कार्यालय पंधरा वर्षांपूर्वी अचानक बंद केले. त्यावेळेपासून हे कार्यालय पूर्ववत सुरू करण्याबाबत शहरात आंदोलने झाली; पण त्यासाठी राजकीय नेत्यांनी फक्त निवेदन स्वीकारणे व आश्वासन देण्यापेक्षा जादा काहीही काम केले नाही. गेल्याच महिन्यात पर्यटन वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पालकमंत्र्यांसोबत झालेल्या पर्यटन विभागाच्या बैठकीत यंदा पर्यटन महोत्सव घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. हा पर्यटन महोत्सव कोल्हापूरच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असा करावा, अशा सूचना चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या होत्या. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना व निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते; पण आता उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या स्वप्नावर पुन्हा पाणी फिरले आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कोल्हापुरात मोठा वाव आहे. श्री अंबाबाईचे मंदिर अशा अनेक धार्मिक स्थळांसह अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे कोल्हापूरला प्रादेशिक कार्यालयाची अत्यंत आवश्यकता आहे; पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. या मागणीसाठी आजही राजकीय नेत्यांनी जोर लावल्यास हे प्रादेशिक कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात उद्योग भवनमध्ये सुरू असलेले ‘एमटीडीसी’चे हे कार्यालय फक्त माहिती व आरक्षण केंद्र आहे. तेथे दरवर्षी आरक्षणातून अवघे १२ लाख रुपये जमा होतात. (प्रतिनिधी)पर्यटन महोत्सव अन् पालकमंत्र्यांसमोर आव्हानकोल्हापुरातील पर्यटन महोत्सवासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते. त्याचवेळी पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला सोलापूर येथे उपप्रादेशिक कार्यालय प्रास्तावित करण्यात आल्याचे पत्र दिले. त्यामुळे हे प्रादेशिक कार्यालय पुन्हा कोल्हापुरात सुरू करण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पाटील यांच्यासमोर आहे.