चपळगाव : सद्यस्थितीत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पातळीवरून जो आदेश येईल. त्यानुसार, अक्कलकोट तालुक्यातील निवडणुका लढविणार असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.
आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जेऊर (ता.अक्कलकोट) येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना म्हेत्रे यांनी आगामी रणनीती सांगितली.
अक्कलकोट तालुक्यात सध्या पक्षाला पोषक वातावरण आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळावे घेत आहोत. वरिष्ठांच्या आदेशानुसार आघाडी करायची की नाही, अथवा स्थानिक पातळीवर लढण्याचा आदेश मिळाल्यास मित्रपक्षांशी चर्चा करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे म्हेत्रे म्हणाले.
यावेळी पं.स.सदस्य विलास गव्हाणे, वकील बागवान, विश्वनाथ हडलगी आदी उपस्थित होते.
----
म्हणून दौरे टाळले...
विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे तालुक्यापासून अलिप्त झाल्याची चर्चा होत असताना, ‘लोकमत’शी बोलताना म्हेत्रे म्हणाले की, मला वैयक्तिक कोरोना झाला होता. कोरोना झाल्यानंतर काय त्रास होतो, याची कल्पना मी करू शकत नाही. गोरगरिबांना कोरोनाचा त्रास होऊ नये, ही त्यामागची भावना होती म्हणून दौरे टाळले.
----
010921\img-20160415-wa0016.jpg
माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा फोटो..