शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

‘लई मोठी करणी हाय.. साडेसात हजारात काढावं लागंल,’ म्हणणारा सोलापुरातील भोंदूबाबा थेट पोलीस ठाण्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:03 IST

सोलापूर : कल्याण नगर परिसरातील पूल पार करुन डाव्या बाजूच्या उतारावर असलेले पत्र्याचे शेड.. या शेडमध्येच कथित पीरबाबा दर्ग्यात ...

ठळक मुद्देबुवाबाजी पर्दाफाश : पोलीस आले.. चला महाराज म्हणाले अन् घेऊन गेले भोंदूबाबांना पोलीस ठाण्यात नेल्याची वार्ता समजताच नातलग मंडळी थेट पोलीस ठाण्यात जमा

सोलापूर: कल्याण नगर परिसरातील पूल पार करुन डाव्या बाजूच्या उतारावर असलेले पत्र्याचे शेड.. या शेडमध्येच कथित पीरबाबा दर्ग्यात भरलेला दरबार.. करणी, भानामती काढून देतो म्हणून जमलेला लोकांचा मेळा.. परगावाहून येणाºया लोकांना ‘भोंदूबाबा सांगत होता.. लई मोठी करणी हाय.. काढावं लागंल.. साडेसात हजार रुपये लागत्याल’. अचानक पोलीस आले, एकच धांदल उडाली. काय घडतेय हे समजण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना उचलले अन् थेट पोलीस ठाण्यात हजर केले. 

गेल्या काही वर्षांपासून शिवाजी मारुती चव्हाण.. वय वर्षे ६५ यांनी आपणास पीरबाबा प्रसन्न आहे, आपल्या अंगात पीरबाबा येतो. करणी, भानामती काढतो म्हणून पैशासाठी लोकांना फसवत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी दोन वेळा गिºहाईक म्हणून शहानिशा केली. खात्री पटताच गुरुवारी पुन्हा गेले. जाताना त्यांनी विजापूर नाका पोलिसांची मदत घेतली. 

दोनवेळा आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे गेलेल्या सुधीर कुर्डे यांना भोंदूबाबांनी ओळखले. पैसे आणले का? विचारणा केली. करणी काढून देतो. एक बाई आणि माणसाने तुला करणी केल्याचे सांगितले. या दरम्यान त्यांना मदत करणाºया महिलांनी भोंदूबाबाची री ओढत बाबा कुठली करणी कायमची काढतात. हैदराबादपासून लांबून लोक येतात, अशी पुष्टी जोडली. हे सारं सुरु असतानाच पोलीस आत आले अन् सारं काही आलबेल चालू असताना एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी थेट भोंदूबाबाचा हात धरत चला म्हणाले. जमलेल्या लोकांना काहीच समजेना. ‘वो साह्यब त्यंनी कायबी केलं नाही, म्हणणाºया माणसाला का घेऊन चाललाव. दुसरीकडं किती काय काय चालतंय तिकडं बगा की’. असा गलका केला. पोलिसांनी त्यांचं काही न ऐकता थेट विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेलं अन् महाराष्टÑ जादूटोणा कायदा ३ अन्वये गुन्हा दाखल केला.

 या कारवाईच्या वेळी अंनिसचे अध्यक्ष रवींद्र मोकाशी, कुंडलिक मोरे, यशवंत फडतरे, ब्रह्मानंद धडके, शालिनी ओक, मधुरा सलवारु  यांच्यासह विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, फौजदार सचिन बनकर, बीट मार्शलचे पोलीस पटेल, जाधव, पोलीस शिवानंद भीमदे, दत्तात्रय काटे, विनोद व्हटकर यांचा सहभाग होता.

असा रचला सापळा- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यशवंत फडतरे आणि कुंडलिक मोरे यांनी भोंदूबाबाकडं जाण्यापूर्वीच विजापूर नाका पोलीस ठाण्यास मदतीची मागणी केली होती. त्यानुसार कल्याण नगर पुलाच्या खाली पोलीस उभे होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास सारे आपापल्या कामात गढलेले असताना पत्रा शेडमध्ये मात्र बुवाबाजीचा पर्दाफाश होत होता. गिºहाईक बनून गेलेल्या इसमाला पैशाची मागणी करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांनी इशारा करताच पोलीस धावले अन् भोंदूबाबाला अटक करण्यात आली.

अन् नातलगांचा लोंढा पोलिसात- भोंदूबाबांना पोलीस ठाण्यात नेल्याची वार्ता समजताच नातलग मंडळी थेट पोलीस ठाण्यात जमा झाली. साहेब त्यंनी काय बी केलं नाही. त्यांना सोडा. अशी विनवणी करण्यात येत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस