आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : हातभट्टी दारू विषयक गुन्हे करणारा सुप्रसिध्द हातभट्टी दारूवाला किसन नामदेव राठोड (वय ४६ रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) यास झोपडपट्टी हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु विषयक गुन्हेगार, अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती, विघातक कृत्यांना आळा घालणे याबाबत अधिनियम सन १९८१ अन्वये स्थानबध्द करण्यात आले आहे़ किसन राठोड याविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण तसेच सदर बझार पोलीस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत़ दगडफेक करणे, अवैध हातभट्टी दारू तयार करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत़ त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली़ ग्रामीण पोलीसांची ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई आहे़ सदर कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विजय कुंभार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, रियाज शेख, मल्लिनाथ चडचणकर, विवेक सांजेकर, कैलास राऊत, स्वामीराव जाधव, विश्वजित हंचे यांनी पार पाडली़
सोलापूरातील हातभट्टी दारूवाला किसन राठोड स्थानबध्द
By appasaheb.dilip.patil | Updated: July 27, 2017 14:15 IST
सोलापूर दि २७ : हातभट्टी दारू विषयक गुन्हे करणारा सुप्रसिध्द हातभट्टी दारूवाला किसन नामदेव राठोड (वय ४६ रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) यास स्थानबध्द करण्यात आले आहे़
सोलापूरातील हातभट्टी दारूवाला किसन राठोड स्थानबध्द
ठळक मुद्देग्रामीण पोलीसांची ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई किसन राठोड याविरूध्द एकूण १३ गुन्हे दाखल