शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून कर्नाटकला मिळणार आणखी १.७० टीएमसी पाणी

By admin | Updated: April 17, 2017 18:44 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर / विजयपूर दि १७ : सोलापूर: कर्नाटकातील विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे कोयना धरणातून आणखी १़७० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने सीमावर्ती भागातील जनतेला दिलासा मिळाल्याचे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़आलमट्टी धरण क्षेत्रावर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाटील यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़महाराष्ट्राला पाणी सोडण्याची हमी देऊनही कर्नाटक सरकारने पूर्ण केली नाही़ गेल्यावर्षीही वारंवार विनंती करूनही कर्नाटकने महाराष्ट्राच्या सोलापूर-सांगली या जिल्ह्यांसाठी पाणी न सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाचे सीमावर्ती भागातून स्वागत होत आहे़यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने कोयना आणि वारणा जलाशयातून २.३६ टीएमसी पाणी सोडले आहे. या पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू आहे. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकाने भीमा किंवा हिरेपडसलगी योजनेतून पाणी देण्याची अट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घातली होती़ या अटीची पूर्तता कर्नाटक सरकारने केली नसल्याकडे लक्ष वेधले असता जलसंपदा मंत्री पाटील यांनी उत्तर देणे सोयीस्करपणे टाळले़आता येणारे जादा १़७० टीएमसी पाणी आलमट्टी धरणात पोहोचेल. त्यावेळी गलगली येथील बॅरेजमधून ते पाणी कोल्हार बॅरेजला पुरविण्यात येईल. त्यामुळे विजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील दुष्काळग्रस्त गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकने शब्द न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़