शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आचेगाव येथे कामधेनू गोशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

दक्षिण सोलापूर : तालुक्यात आचेगाव येथे गोशाळा सुरू करण्यात आली आहे. या गोशाळेचे भूमिपूजन सद‌्गुरु बी. टी. गुरव ...

दक्षिण सोलापूर : तालुक्यात आचेगाव येथे गोशाळा सुरू करण्यात आली आहे. या गोशाळेचे भूमिपूजन सद‌्गुरु बी. टी. गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी वंदे मातरम‌् जनसेवा संघटनेचे अध्यक्ष रविकुमार कुलकर्णी, गोशाळेचे कार्यवाह वीरेंद्र हिंगमिरे, भीमाशंकर मात्रे, बांधकाम समिती अध्यक्ष सुनील गुरव, चैतन्यकुमार शहा, विजय पाटील, रेवणसिद्ध हालोळी, गौरीशंकर वाले, विजय खंडाळी, उमाबाई बाबानगरे, गीता मणुरे, सुनील धरणे आदी मान्यवर उपस्थिती होते.

गोविंद वृद्धाश्रमात वस्त्रदान

टेंभुर्णी : माजी सहकार राज्यमंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी येथील गोविंद आश्रमात महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने अनाथ महिलांना वस्त्रदान करण्यात आले. नातेपुते येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाच्या अध्यक्ष पद्मजादेवी मोहिते-पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, अकलूज ग्रामपंचायतीच्या सदस्या उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी जनसेवा संघटनेचे संचालक मल्लिकार्जुन वैद्य-देशमुख, राहुल लाळगे, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष धनंजय देशमुख, राजाभाऊ गुळवे, संतोष भिसे उपस्थित होते.

टेंभुर्णीत वृक्षारोपण

टेंभुर्णी : येथील स्वस्त धान्य पुरवठा विभागाच्या गोडाउन परिसरात पुणे विभागीय पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून वृक्षलागवडीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक ए. के. कोरबु, एस. आय. कुंतलकर, गुदामचालक अण्णासाहेब लांडगे, रास्त भाव दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास भोसले उपस्थित होते. यावेळी ५५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमास टेंभुर्णी, बेंबळे, पिंपळनेर, आढेगाव, चांदज, शेवरेण परिसरातील रास्त धान्य दुकानदार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विकास भोसले, आरडे, पिंटू कुटे, दादा ढवळे, बाबा मस्के, राहुल देशमुख, आबा ढवळे उपस्थित होते.

करमाळ्यात भाजपच्या वतीने वडाची रोपे वाटप

करमाळा : वटपौर्णिमेनिमित्त भाजपच्या वतीने करमाळा येथे महिलांना वडाची रोपे वाटप करण्यात आली. तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी सावित्री वटवृक्ष स्पर्धा जाहीर करण्यात आली. पुढील वर्षी या रोपांचे परीक्षण करून स्पर्धकांना बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी महिला आघाच्या जिल्हा चिटणीस अश्विनी भालेराव, श्रीराम प्रतिष्ठानचे भीष्माचार्य चांदणे, गजराज चिवटे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे, उपाध्यक्ष भय्या गोसावी, जयंत काळे-पाटील, प्रल्हाद कोकीळ, विश्वजित चिवटे, गणेश गाेसावी उपस्थित होते.