शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव, एक गणपती’साठी जयसिंगपूर पोलिसांचा पुढाकार

By admin | Updated: August 5, 2014 00:10 IST

तीन गावांचा प्रतिसाद : डॉल्बिमुक्त गणेशोत्सवाचा उपक्रमही राबविणार

संदीप बावचे -जयसिंगपूर , समाज एकसंध राहावा, भेदभाव नष्ट व्हावा, गावात एकोपा रहावा या दृष्टिकोनातून ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याने आता पुढाकार घेतला आहे. डॉल्बिमुक्त गणेशोत्सवाबरोबरच हा उपक्रमही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये राबविण्याची संकल्पना निश्चितच अन्य पोलीस ठाण्यांसमोर प्रेरणादायी ठरणार आहे. कोथळी, उमळवाड व कोंडिग्रे ही तीन गावे ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमासाठी सज्ज झाली आहेत. समाजाचे प्रबोधन व्हावे, असा उदात्त हेतू घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याची सामाजिक चळवळ सुरू झाली. ही चळवळ अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. याच भावनेतून सव्वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबर ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तींंची बैठक आयोजित करून यावेळी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बहुतांश गावांत ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्याबाबत पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती योजना, निर्मलग्राम अशा शासनाच्या विविध योजनांत सहभाग घेऊन अनेक पुरस्कार पटकाविलेल्या कोथळीपासून उपक्रमास सुरुवात झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून गावातील विविध घटनांमुळे हे गाव राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनले असतानाच ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्याच्या निर्णय घेऊन गावाने एकोप्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. उमळवाड व कोंडिग्रे गावांनीदेखील या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. पहिल्या टप्प्यात तीन गावेपहिल्या टप्प्यात या तीन गावांनी प्रतिसाद दिला असून, आता दानोळी, जैनापूर, निमशिरगाव, चिपरी, उदगाव, संभाजीपूर, कवठेसार, तमदलगे, आदी गावांतदेखील ही संकल्पना राबविण्यासाठी पोलीस ठाण्याने पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून डॉल्बिमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी मुक्तीबरोबरच ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रमदेखील चांगल्या प्रमाणात यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विविध मंडळांनी गणरायाची स्थापना करणे आणि मिरवणुकीत ईर्षा निर्माण होऊन वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात एकोपा रहावा या दृष्टिकोनातून ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमापासून एक चांगली सुरुवात गावांनी करावी. त्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पोलीस ठाण्याच्या या आवाहनाला गणेशोत्सव मंडळे निश्चितच प्रतिसाद देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.