शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

By आप्पासाहेब पाटील | Updated: November 2, 2025 05:41 IST

हिमायतनगर (जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वाले‌गावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर ठरले शासकीय महापुजेचे मानाचे वारकरी

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: आज कार्तिकी एकादशीचा सोहळा...यानिमित्ताने पंढरपुरात भाविकांचा उत्साह मोठा दिसून येत आहे.  अशातच रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक व पोटा ॥बू ।। (ता. हिमायतनगर जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वाले‌गावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर या मानाच्या वारकरी दाम्पत्यांकडून करण्यात आली.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, रोहयो मंत्री भरत गोगावले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय महापूजेनंतर पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. आज एकादशी निमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्xयाच्या कानाकोपऱ्यातून पाच लाख भाविक दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी वारकरी आणि भक्तांची मांदियाळी पहायला मिळत आहे. हरी नामाचा जयघोष... मुखी विठ्ठल विठ्ठल नाम... म्हणून लाखो वारकरी चंद्रभागेच्या स्नानासाठी गर्दी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde Performs Vitthal-Rukmini Puja on Kartiki Ekadashi with Wife

Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde, with his wife, performed the Vitthal-Rukmini puja at Pandharpur on Kartiki Ekadashi. The ceremony, held early Sunday, was attended by ministers, officials, and devotees. Lakhs of devotees thronged Pandharpur, chanting Vitthal's name and bathing in the Chandrabhaga river, marking the auspicious occasion.
टॅग्स :PandharpurपंढरपूरEknath Shindeएकनाथ शिंदे