शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

‘जागर द ट्रॅव्हलिंग शो’२७ पासून

By admin | Updated: January 21, 2015 23:55 IST

पेन्सिल चित्रांची किमया : शशिकांत धोत्रे यांची जादूमय कला

कोल्हापूर : पेन्सिल चित्रांद्वारे सुरेख कलाकृती साधणारे चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या ‘जागर द ट्रॅव्हलिंग शो’ या चित्रप्रदर्शनाला २७ तारखेपासून प्रारंभ होत आहे. धोत्रे यांनी स्वत: या प्रदर्शनाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन संध्याकाळी ६ वाजता श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, डी. एम. कॉर्पोरेशनचे दिलीप मोहिते, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, अजय दळवी, जी. एस. माजगावकर, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. धोत्रे यांनी विविधरंगी पेन्सिलीने रेखाटलेल्या २० चित्रांचा समावेश आहे. चित्रकाराने कॅनव्हासवर तैलरंग काढल्याप्रमाणे भासावे, अशा सुंदर कलाकृती पेन्सिलच्या धारदार टोकातून निर्माण झाल्या आहेत. सुंदर चित्रांचे फक्त प्रदर्शन या उद्देशाने आयोजित या ‘ट्रॅव्हलिंग शो’च्या निमित्ताने ते देशभर भ्रमंती करणार आहेत. काळ्या रंगांवर थेटपणे चित्र निर्मिती करणे ही त्यांची खास शैली आहे. त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिचित्रे अद्वितीय अशी आहेत. या कालावधीत ते कोल्हापूरच्या संस्कृतीचाही अभ्यास करणार आहे. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ यावेळेत सुरू राहणार आहे.दगड घडवणाऱ्या हातात पेन्सिल धोत्रे हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचे. वडार समाजात जन्मलेल्या शशिकांत यांच्या वडिलांचे अख्खे आयुष्य दगड फोडण्यात गेले. या दगडात वावरताना वयाच्या सातव्या वर्षी शशिकांत यांनी पेन्सिलीने चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. सुरेख चित्रे रेखाटण्याची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभली आहे. जागर या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील संस्कृती पेन्सिल चित्रातून रेखाटणार आहे. या चित्रांचे प्रदर्शन २०१९ साली युरोपमध्ये होणार आहे.