शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

लोखंडी बाकडे खरेदीचा विषय तहकूब

By admin | Updated: June 28, 2014 00:42 IST

मनपा स्थायी समिती सभा : सत्ताधाऱ्यांचा डाव फसला

सोलापूर : शहरातील विविध नगरसेवकांनी मागणी केलेल्या लोखंडी बाकडे खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत तहकूब करण्यात आला. स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी महापालिकेत सभा झाली. या सभेत नगर अभियंता कार्यालयाकडून नगरसेवकांकडून बाकडे खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला. यात मक्तेदार अमरदीप कन्स्ट्रक्शनकडून प्रति नग १९५0 प्रमाणे ४ लाख ९९ हजारांचे २५६ बाकडे खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यापूर्वी असे बरेच बाकडे वाटप झाले आहेत. नंतर त्या बाकड्यांचे काय होते हे समजत नाही. त्यामुळे अशा बाकड्यांची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून सभापती मिस्त्री यांनी हा विषय तहकूब केला. तसेच याचा मक्तेदाराचा ९८0 प्रमाणे ५१0 ट्री गार्ड खरेदीचा विषय तहकूब करण्यात आला. मात्र प्रभाग क्र. ४७ साठी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी प्रति नग ७ हजार ७५0 रुपयांचे ४0 व्हीआयपी लोखंडी बेंच खरेदीला एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रगती स्टील फॅब्रिकेशनला हा मक्ता देण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य अभियंता विभागाने जीआय पाईप पुरविण्याची लक्ष्मी नारायण सेल्स कॉर्पोरेशनचा १५ लाखांचा प्रस्ताव झोनकडे माहिती नसल्याने व अक्कलकोट रोड परिसरात डीआयके ७ ग्रेडच्या पाईप पुरविणे व घालण्याचा सद्गुरू इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चा ८१ लाखांचा प्रस्ताव फेरसादर करण्यासाठी पाठविण्यात आला. सन १९९५ पूर्वीच्या रोजंदारीतून आस्थापनेवर कायम झालेल्या सेवकांचे निवृत्ती वेतन व उपदानाबाबतचा प्रस्ताव, नेहरूनगर पाण्याची टाकी ते नवीन आरटीओ कार्यालयापर्यंत पाण्याची पाईपलाईन घालण्याच्या मयुरा कन्स्ट्रक्शनच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली. -----------------------------‘हुतात्मा’ भाडेवाढ नाहीहुतात्मा स्मृती मंदिर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले असून, भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविला होता. पण स्थायी समितीने कोणतीही दरवाढ न करता पूर्वीच्याच दराने भाडे आकारण्यास एकमताने मान्यता दिली. आतील खुर्च्या किंवा इतर साहित्याची मोडतोड संबंधितांकडून वसूल करावी, त्यासाठी काही रक्कम डिपॉझिट म्हणून घेण्यास मान्यता देण्यात आली. ------------------------श्वानदंश लस खरेदीडफरीन प्रसूतिगृहातील राजमाता अहिल्यादेवी होळकर केंद्रासाठी १४२ रूपये ५0 पैसे या दराने पाच हजार श्वानदंश लस खरेदीचा निर्णय एकमताने झाला. मुंबईच्या श्री. जी. इंटरनॅशनल या मक्तेदारास हे काम देण्यात आले आहे.