शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

Interview; देशात देशविरोधी-संस्कृतीविरोधी शक्ती बाहेरच्यांनी पोसून ठेवलेल्या आहेत : किशोरजी व्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:17 IST

गोपालकृष्ण मांडवकर  आचार्य किशोरजी व्यास यांचा सोलापुरात कार्यक्रम सुरु असतानाच तिकडे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. धर्म-अध्यात्मासोबतच देशातील सध्यस्थितीबद्दल भाष्य ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीचे मूळ वेदात आहे. तो टिकून राहावा यासाठी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानने ३४ वेद विद्यालये देशभर स्थापन केलीत - किशोरजी व्यासराममंदिर होणे नितांत आवश्यक आहे. निर्मितीच्या कामात आधीपासून ज्यांनी भाग घेतला त्यांच्याकडूनच होणे आवश्यक - किशोरजी व्यास

गोपालकृष्ण मांडवकर 

आचार्य किशोरजी व्यास यांचा सोलापुरात कार्यक्रम सुरु असतानाच तिकडे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. धर्म-अध्यात्मासोबतच देशातील सध्यस्थितीबद्दल भाष्य करणाºया या संताने हल्ल्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. देशातील युवा वर्गाकडूनही त्यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत अपेक्षा व्यक्त केल्या. 

प्रश्न : देशातील अंतर्गत सुरक्षेसंदर्भात आपणास काय वाटते?उत्तर : देशात सुशिक्षित वर्ग वाढला हे खरे आहे, मात्र यातील एका वर्गाच्या मनात राष्टÑविरोधी भावना निर्माण करण्यात आल्या आहेत. देशातील अध्यात्म आणि संस्कृती भिन्न असली तरी देशाचे संरक्षण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे. त्यात मतभेद नको. तिकडे सैनिकांवर हल्ला झाल्यावर टिष्ट्वटरवर पडलेल्या आनंदाच्या आणि अभिनंदनाच्या पोस्ट पाहून मी बेचैन झालो. याचा अर्थ देशात देशविरोधी-संस्कृतीविरोधी शक्ती बाहेरच्यांनी पोसून ठेवलेल्या आहेत, हे स्पष्ट दिसते. 

प्रश्न : हे कसे रोखायला हवे?उत्तर : देशातील एक सुशिक्षित वर्ग परक्यांचा धार्जिणा आहे. तो अशी कामे करतो. त्यामुळे राष्टÑावर निष्ठा असलेल्या शक्तींनीच समर्थ व्हावे. उघडपणे वैचारिक छात्रवृत्ती स्वीकारावी. या निष्ठावानांनी अशा विचारांचे साधार खंडन करावे. राजीव मल्होत्रा, डेव्हिड फ्राऊली, सुब्रह्मण्यम स्वामी, चारुदत्त आफळे ही मंडळी उत्तम काम करीत आहेत. युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. आपले जीवन आपल्यासाठी नसून परिवार, समाज, मोठ्या ध्येयाकरिता असल्याचा भाव रुजावा आणि सेवावृत्ती वाढावी. 

प्रश्न : अध्यात्म आणि मेडिटेशनमधून यावर मार्ग कसा शोधता येईल ?उत्तर : अलीकडे सर्वांचे मन सैरभैर झाले आहे. मन एकाग्र असेल तर तणाव राहत नाही. अध्यात्माचा संबंध मनाशी व त्या अनुषंगाने देहाशी असतो. मेडिटेशनमुळे मनाची एकाग्रता वाढते, तणाव दूर होतो. योग हे अध्यात्माचे अंगच. अलीकडेच रात्रंदिवस धावपळ व असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढली आहे. या स्थितीत अध्यात्माला अर्थात योगाला पर्याय नाही. 

राममंदिर व्हावेच राममंदिर होणे नितांत आवश्यक आहे. निर्मितीच्या कामात आधीपासून ज्यांनी भाग घेतला त्यांच्याकडूनच होणे आवश्यक आहे. मात्र आक्रस्ताळेपणा करून चालणार नाही. विद्यमान सरकार अनुकूल आहे. सुप्रिम कोर्टाकडून आम्हाला आशा होती. मात्र त्यांनी विलंब केला आहे. तरीही काही महिने प्रतीक्षा करायला हवी.

वेदांग, वेदार्थ आणि वेदांतभारतीय संस्कृतीचे मूळ वेदात आहे. तो टिकून राहावा यासाठी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानने ३४ वेद विद्यालये देशभर स्थापन केलीत. या सर्व विद्यालयांचे केंद्रीय महाविद्यालय आळंदीत सुरू करीत आहोेत. वेदांग, वेदार्थ आणि वेदांत अशा तीन अंगांचे प्रशिक्षण यात मिळेल. तिथे संशोधनकार्यही चालेल. लोकांच्या जीवनात उतरावे यासाठी प्रचारकांचे निर्मिती कार्य होईल. हे सर्वांसाठी मुक्तद्वार असेल. फेब्रुवारी २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन एप्रिलपासून कार्य सुरु होईल.

टॅग्स :Solapurसोलापूरinterviewमुलाखत