शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शिरगाव येथे आज आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पधा

By admin | Updated: August 26, 2014 23:54 IST

चार लाखांची बक्षिसे : बसवेश्वर यात्रेचे आयोजनर्

निपाणी : शिरगाव (ता. चिकोडी) येथील ग्रामदैवत बसवेश्वर देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त उद्या, बुधवारी आंतरराष्ट्रीय नामांकित मल्लांच्या भव्य निकाली जंगी कुस्त्यांचे आयोजन केले आहे. विजेत्यांना चार लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत केसरी आंतरराष्ट्रीय पैलवान सत्येंद्र हरियाणा आणि उपमहाराष्ट्र केसरी सुनील साळुंखे यांच्यात होणार आहे. त्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार आणि लोप्रीतसिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे. त्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान गुरुसेवकसिंग, पंजाब आणि कार्तिक दावणगेरे यांच्यात होत असून, विजेत्यांना ७५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. पैलवान सिद्धाप्पा गुलबर्गा-जमखंडी आणि आनंद लमाणी-दावणगिरी यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी लढत होणार असून, विजयी पैलवानाला ३० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती नागप्रसाद- धारवाड आणि नीरजकुमार- पंजाब यांच्यात होणार आहे.याशिवाय पैलवान कृष्णा-बागलकोट, यल्लाप्पा कोणी, विशाल- कोल्हापूर, आप्पासाहेब इंगळगी, रूपेश इंडी, केंपाण्णा तोरणहळ्ळी, अनिल उमराणी, संजय जमखंडी, सतीश सूर्यवंशी, गोपाल सुलतानपूर, शिवाजी अथणी, शिवानंद निरवानट्टी, लोकाप्पा चिम्मट, श्रीधर रायबाग यांच्यात चटकदार कुस्त्या होणार आहेत. (प्रतिनिधी)