शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रूपाभवानी मंगल कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी

By admin | Updated: September 2, 2014 16:54 IST

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रूपाभवानी मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या उद्यानातील विहिरीची पाहणी केली.

सोलापूर. - आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रूपाभवानी मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या उद्यानातील विहिरीची पाहणी केली. या विहिरीतील पाझर चांगले असल्याने गाळ काढल्यास पालिकेला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते अशी माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दिली. सोलापूर : जोडभावी पेठ पोलीस ठाण्याची इमारत झुकल्याने रूपाभवानी मंदिर येथील मंगल कार्यालयाची जागा देण्याच्या उद्देशाने सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पाहणी केली. पोलीस स्टेशन हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दयानंद महाविद्यालयाजवळील पाण्याच्या टाकीशेजारी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन आहे. काही वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेली ही इमारत झुकल्याने ती धोकादायक बनली आहे. तसेच अपुरी जागा, तोकडी बैठक व्यवस्था, मुद्देमालासाठी कमी जागा, महिला अधिकार्‍यांची होणारी गैरसोय या सर्व बाबींवर 'लोकमत'मधून प्रकाश टाकण्यात आला होता. याची दखल घेत पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांना पालिकेस तात्पुरत्या जागेचा प्रस्ताव पाठवून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खाडे यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयुक्तांनी रूपाभवानी मंदिर येथील रूपाभवानी मंगल कार्यालयाला भेट दिली. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक जगदीश पाटील, शाहू शिंदे आदी रूपाभवानी मंदिराचे ट्रस्टी उपस्थित होते. आयुक्तांनी संपूर्ण मंगल कार्यालयाची पाहणी केली. दरम्यान प्रताप चव्हाण यांनी या मंगल कार्यालयाचा सध्या कसा दुरूपयोग होत आहे याची माहिती आयुक्तांना दिली. या ठिकाणी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन झाल्यास मंदिर आणि महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला कसा फायदा होईल याची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली. (प्रतिनिधी)