शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचा ग्रामपंचायतींवर प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:21 IST

गावागावातील राजकीय स्थिती सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. काही गावांमधील राजकीय परिस्थिती चिघळत असून, निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. ...

गावागावातील राजकीय स्थिती सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. काही गावांमधील राजकीय परिस्थिती चिघळत असून, निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मात्र काही गावांमधील उच्चशिक्षित तरुणाई गाव बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असताना दिसत आहे. यामध्ये विकासाच्या अनेक मुद्द्यांबरोबर गावातील एकोपा टिकवण्यासाठी तरुणाई बैठका घेताना दिसत आहे, तर दुसरीकडे भ्रष्टाचार व विकास न झाल्याच्या मुद्द्यावर ज्‍येष्‍ठांविरुद्ध दंड थोपटत निवडणुकीचा यल्गार पुकारणारी तरुण फळी मैदानात उतरली आहे.

तरुणाईचा वरचश्मा

अलीकडील काळात गावागावातील उच्चशिक्षित तरुणांकडे वरिष्ठ पातळीच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास आहे. यामुळे गावगाड्यातील राजकीय वातावरणात होत असलेल्या नुकसानीचा आलेख गावासमोर मांडत ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी एकवटली आहे. तर काही गावांमधील तरुणाई मात्र भ्रष्टाचार, विकास अशा काही मुद्द्यांसाठी ज्येष्ठांविरुद्ध नाराजी व्यक्त करून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत. एकूणच ग्रामपंचायत बिनविरोध अथवा रंगतदार असा तरुणाईच्या जादूई करिष्मा पाहायला मिळणार आहे.