शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न दोन लाख तर खर्च साडेसात लाख, सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:41 IST

मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. 

ठळक मुद्देसोलापूर दर्शन ही बस पुन्हा सुरू करण्यात येणार अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची मदत मनपाकडे असलेल्या थकीत रकमांबाबत पाठपुरावा करू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी सहायक आयुक्त हराळे यांच्यावर दिली आहे. सध्या दिवाळी सानुग्रह अनुदान, उचल आणि पाच महिन्यांचा थकीत पगार द्यावा, यासाठी कर्मचाºयांनी सात रस्ता डेपोसमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. २६ आॅक्टोबर रोजी लाक्षणिक संप करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे. अशा परिस्थितीत पदभार घेतलेल्या हराळे यांनी कर्मचाºयांच्या बैठकांवर बैठका घेऊन परिस्थिती सुधारण्यावर भर दिला आहे. मंगळवारी मुख्य तिकीट निरीक्षक भारत कंदकुरे व प्रशासनातील अधिकाºयांची बैठक घेऊन उत्पन्नवाढीसाठी मार्गाचे नियोजन केले. सध्या ४१ बस मार्गावर आहेत. यातून दररोज दोन लाख उत्पन्न मिळत आहे. पण खर्च मात्र साडेसात लाख आहे. साडेपाच लाखांचा तोटा भरून काढण्यासाठी आणखी  दहा गाड्या मार्गावर आणण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रवासी वाढविण्यासाठी शहरातून रिक्षात होणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची मदत घेण्याचे ठरविण्यात आले. सोलापूर दर्शन ही बस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. साखर कारखाना व सैफुलदरम्यान शटल बससेवा सुरू करून उत्पन्नवाढीवर भर देण्यात येणार असल्याचे हराळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कर्मचाºयांना विश्वासात घेऊन जगण्यासाठी आहे त्या परिस्थितीशी लढू ही भूमिका घेऊन काम करणार आहे. -------------------------संपात बस बंद नाहीÈभारी व्यवस्थापक हराळे यांनी मंगळवारी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अशोक जानराव यांची भेट घेऊन लाक्षणिक संप मागे घेण्याबाबत विनंती केली. त्यावर जानराव यांनी आंदोलन सुरू राहील, मात्र बस बंद ठेवून लोकांची गैरसोय केली जाणार नाही, याची हमी दिली. कर्मचाºयांचे थकीत वेतन मिळाले पाहिजे, ही मागणी न्याय्य आहे. यासाठी मनपाकडे असलेल्या थकीत रकमांबाबत पाठपुरावा करू. पण यापुढे वेतनासाठी मनपावर अवलंबून न राहता, दररोजच्या उत्पन्नातून ५० हजार वेतनासाठी काढून ठेवण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.